डॉन बॉस्को महाविद्यालयात प्राध्यापक पदांसाठी भरती

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
12 hours ago
डॉन बॉस्को महाविद्यालयात प्राध्यापक पदांसाठी भरती

पणजी येथील प्रसिद्ध 'डॉन बॉस्को महाविद्यालया'त शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विविध विभागांमध्ये सहायक प्राध्यापक आणि महाविद्यालय समुपदेशक पदांसाठी कंत्राटी व व्याख्याता तत्वावर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. गोवा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या बी.कॉम., बी.ए. आणि बी.पी.एड. अभ्यासक्रमांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

अ. क्र.विभाग / पदकंत्राटी तत्त्वावरलेक्टरर तत्त्वावर
सहायक प्राध्यापक - वाणिज्य०४०१
सहायक प्राध्यापक - इंग्रजी०३०१
सहायक प्राध्यापक - मानसशास्त्र०४०१
सहायक प्राध्यापक - शारीरिक शिक्षण०१०१
सहायक प्राध्यापक - इतिहास-०१ (विषम सत्रासाठी)
सहायक प्राध्यापक - पर्यावरण अभ्यास-०१ (विषम सत्रासाठी)
सहायक प्राध्यापक - हिंदी-०१
सहायक प्राध्यापक - कोंकणी-०१
सहायक प्राध्यापक - अर्थशास्त्र-०१
१०समुपदेशक०१-

महाविद्यालयाने वाणिज्य, इंग्रजी, मानसशास्त्र, शारीरिक शिक्षण, इतिहास, पर्यावरण अभ्यास, हिंदी, कोंकणी आणि अर्थशास्त्र अशा एकूण १० विभागांमध्ये रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. वाणिज्य विभागात कंत्राटी तत्वावर ४ आणि लेक्चरर तत्वावर १, तर इंग्रजी विभागात कंत्राटी तत्त्वावर ३ जागा भरण्यात येणार आहेत. याशिवाय, महाविद्यालयासाठी १ समुपदेशक पद देखील कंत्राटी तत्त्वावर भरले जाईल.

अटी व पात्रता

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे यूजीसी (UGC), गोवा विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संचालनालय (DHE) यांच्या नियमांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता असणे बंधनकारक आहे. उमेदवाराला कोंकणी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे असून, मराठी भाषेचे ज्ञान असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत

इच्छुक उमेदवारांनी आपल्या अर्जासोबत एसएससी पासूनच्या सर्व गुणपत्रिकांच्या स्वयं-प्रमाणित प्रती, जन्म दाखला, अनुभवाचे प्रमाणपत्र, रोजगार कार्ड आणि १५ वर्षांचे गोव्याचे रहिवासी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून (२ जून २०२६) पुढील १५ दिवसांच्या आत प्राचार्यांकडे अर्ज पोहोचणे आवश्यक आहे. अपूर्ण किंवा उशिरा आलेले अर्ज नाकारले जातील. पात्र उमेदवारांना मुलाखतीचे मेसेज ईमेलद्वारे पाठवले जाईल. अधिक तपशीलासाठी उमेदवारांनी कॉलेजच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.