अंकोला येथे खुनाचानाचा प्रयत्न; फरार संशयितांची माहिती देणाऱ्यांना २५ हजारांचे बक्षीस

माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवणार

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
10 hours ago
अंकोला येथे खुनाचानाचा प्रयत्न; फरार संशयितांची माहिती देणाऱ्यांना २५ हजारांचे बक्षीस

पणजी : कर्नाटकातील उत्तर कन्नडा जिल्ह्यातील अंकोला पोलीस स्थानक (Ankola Police Station)  हद्द‌ित खुनाचा प्रयत्न करून फरार असलेल्या दोघांची माहिती देणाऱ्यांना पोलिसांनी प्रत्येकी २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. याप्रकरणातील संशयितांची नावे अब्दुल घनी आणि मोहम्मद इम्रान सलमानी अशी आहेत.  

वरील दोघांची माहिती देणाऱ्यांना २५ हजारांचे बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती अंकोला पोलिसांनी दिली. या दोघांविषयी ठोस माहिती असल्यास पोलीस निरीक्षकाच्या ९४८०८०५२५८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अंकोला पोलिसांनी केले आहे. माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. 

हेही वाचा