सिंधुदुर्गात मुंबई–विजयदुर्ग रो-रो सेवेची यशस्वी चाचणी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
03rd September 2025, 10:52 am
सिंधुदुर्गात मुंबई–विजयदुर्ग रो-रो सेवेची यशस्वी चाचणी

देवगड : तळकोकणातील ऐतिहासिक विजयदुर्ग बंदरातून मुंबईसिंधुदुर्ग रो-रो सेवेची चाचणी आज यशस्वीरीत्या पार पडली. महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या उपक्रमामुळे कोकणवासीय व पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

केंद्रीय शिपिंग मंत्रालय आणि राज्य बंदरे विभागाच्या मंजुरीनंतर १४७ परवानग्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या जलवाहतुकीमुळे कोकणातील प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सोयीस्कर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हवामानातील बदलामुळे रो-रो बोट नियोजित वेळेपेक्षा तब्बल १२ तास उशिरा विजयदुर्ग बंदरात दाखल झाली; तरीही चाचणी यशस्वी ठरल्याने या सेवेच्या प्रत्यक्ष सुरुवातीबाबत कोकणात उत्सुकता वाढली आहे.

हेही वाचा