‘लखपती दीदी’चा धमाका: १९ हजारांहून अधिक महिला लखपती!

ग्रामीण विकास खात्याची माहिती : महिलांचे वार्षिक उत्पन्न १ लाखांहून अधिक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th July, 10:04 pm
‘लखपती दीदी’चा धमाका: १९ हजारांहून अधिक महिला लखपती!
💼
गोव्यात १९ हजारांहून अधिक महिला 'लखपती दीदी' झाल्या
पणजी : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'लखपती दीदी' योजनेने गोव्यात मोठा टप्पा गाठला आहे. राज्यातील १८९ पंचायतींमधील स्वयंसहाय्य गटांमधील १९ हजारांहून अधिक महिला आता 'लखपती दीदी' झाल्या आहेत, अशी माहिती ग्रामीण विकास खात्याने दिली आहे.
💰
लखपती दीदी योजनेचे मुख्य तत्त्व
एखाद्या स्वयंसहाय्य गटातील महिलेचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त नोंदवले गेल्यास, तिला 'लखपती दीदी'चा दर्जा दिला जातो. या महिलांना शाश्वत उद्योजकतेच्या माध्यमातून उत्पन्न वाढवण्याचे मार्ग दाखवले जातात, तसेच उत्कृष्ट जीवनमानासाठी त्यांना प्रेरणा दिली जाते.
📊
योजनेची व्याप्ती अन् अंमलबजावणी
स्वयंसहाय्य गट
४,०४६
एकूण गट
सहभागी महिला
५५,६९९
एकूण महिला
लखपती दीदी
१९,३३९
स्वावलंबी महिला
📍 दोन्ही जिल्ह्यांतील सद्यस्थिती
N
उत्तर गोवा
लखपती दीदी: १२,१६९
सीआरपी: ७०
डिजिटल रजिस्टर: २१,२९८
S
दक्षिण गोवा
लखपती दीदी: ७,१७०
सीआरपी: ७१
डिजिटल रजिस्टर: १९,१९८
या उपक्रमांतर्गत महिलांना उद्योजकता नियोजनासाठी प्रशिक्षित समुदाय संसाधन व्यक्ती (सीआरपी) मार्गदर्शन करतात. संसाधनांचा प्रभावी वापर कसा करावा हे त्यांना शिकवले जाते, तसेच त्यांचे काम डिजिटल प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात येते, असेही खात्याने स्पष्ट केले.
📌 नोंद: या योजनेचा मुख्य उद्देश सहभागी महिलांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा अधिक करणे हा आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना चांगले जीवन जगता यावे, यासाठी स्वयंसहाय्य गटांतील महिलांना विविध उपक्रमांद्वारे प्रशिक्षण दिले जात आहे.
हेही वाचा