सांतिनेजमधील तीन रस्ते २८ मे रोजी होणार खुले

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
25th May 2024, 11:09 pm
सांतिनेजमधील तीन रस्ते २८ मे रोजी होणार खुले

पणजी : स्मार्ट सिटीच्या कामांमुळे बंद असणारे सांतिनेज परिसरातील तीन रस्ते २८ मे रोजी वाहतुकीस खुले होणार आहेत. यानुसार विवांता जंक्शन ते शीतल हॉटेल, शीतल हॉटेल ते काकुलो मॉल आणि शीतल हॉटेल ते मधुबन जंक्शन हे रस्ते २८ रोजी रात्री ९ वाजता खुले होतील. हे रस्ते अनेक महिने बंद आहेत. ते सुरू होणार असल्याने या परिसरात राहणाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

पणजीहून सांतिनेज तसेच ताळगावला जोडणारा मुख्य रस्त्यांपैकी एक असणारा विवांता जंक्शन ते शीतल हॉटेल हा रस्ता तीन महिन्यांहून अधिक काळ बंद आहे. यामुळे येथील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय वाहतुकीसाठी दयानंद बांदोडकर या पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागत आहे. यामुळे या रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. येथे बालभवन ते कला अकादमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत.

तसेच शीतल हॉटेल ते मधुबन जंक्शन हा रस्ता देखील दोन महिने बंद आहे. हा रस्ता ३१ जानेवारी रोजी पूर्ण करण्याचे आश्वासन स्मार्ट सिटीने दिले होते. मात्र, ते पूर्ण होऊ शकले नाही. रस्ता बंद असल्याने स्मशाभूमीत जाण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. तुलनेने शीतल हॉटेल ते काकुलो मॉल या रस्त्याचे काम वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. हे तिन्ही रस्ते खुले झाल्यावर पणजीहून ताळगावला जाणे पुन्हा एकदा सोपे होणार आहे. 

हेही वाचा