GPSC / UPSC - मुलाखत कशी द्यावी


18th January, 05:59 pm

UPSC मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थ्याला दिल्ली येथील UPSC हेडक्वार्टर्स येथे प्रत्यक्ष मुलाखती साठी बाेलावण्यात येते. ज्या विद्यार्थ्यांना असे बाेलावण्यात आले नसेल त्या विद्यार्थ्यांनी समजून घ्यायचे की परत त्यांना आता नवीन कॅलेंडर वर्षात प्रिलीम व मेन्स या परीक्षा उत्तीर्ण व्हावयाची तयारी करावी लागणार आहे. येथे एकदा मेन्स परीक्षा पास झालाे आता काम फत्ते झाले असे मानून चालत नाही. हा पर्सनलीटी टेस्ट एका गडावरचा बालेकिल्ला असताे. कालून गड सर करणे म्हणजे प्रिलीम. परत पुढे चढाई करुन त्याच दमाने तटबंदी भेदून किल्ला जिंकणे म्हणजे मेन्स परीक्षा व पुढे त्याच दमात सर्वात कठिण बालेकिल्ला जिंकणे म्हणजे पर्सनलीटी टेस्ट अर्थात इंटरव्यू. हे सर्व जसे एका दमात करावे लागते तसेच हे टप्पे एकाच कॅलेंडर वर्षात पार करावे लागतात. ढाेलकपूर येथे UPSC हेड क्वार्टर आहे. यामध्ये एक पॅनल असते जे उमेदवाराला साधारणपणे ४५ min  ते १ तास प्रश्न विचारते. ही चाचणी गप्पा गाेष्टींच्या स्वरुपात सुरु हाेते व जसे जसे विषय येत जातील तशी तशी आपली मते, सहाय्यकारी मते, विरुद्ध मते, तटस्थ मते, बॅलन्स बिहेविअर, प्रामाणिकपणा, प्रशासकीय गुण, निर्णय क्षमता, आत्मविश्वास, विषयाचे आकलन, त्याची खाेली, माॅरॅलीटी ती तपासली जाते. स्मरणशक्ती, जुन्या घडलेल्या परंतु आवश्यक तपशील, अधिकाऱ्यांचे निर्णय, त्यावेळची परिस्थिती, हतबलता यावर सुद्धा मत प्रदर्शन करावे लागते. खूपदा विद्यार्थ्यांच्या हाॅबी/छंद या प्रकारापासून चर्चा सुरु हाेऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांने इंप्रेशन मारायला तसे लिहिले आहे की त्यात खरंच त्याला रुची आहे. आणि रुचीच्या गाेष्टी ताे कितपत मनापासून जपताे व त्यात त्याला कसा आनंद मिळताे हे पण तपासले जाते. यामुळे जर विद्यार्थ्यांने प्रामाणिकपणा बाळगला तर मुलाखतीमध्ये फायदा हाेताे म्हणजे हाताेच आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे द्यायालाच हवे आहे हा अट्टाहास साेडावा. ज्या प्रश्नाचे उत्तर माहिती नसले अथवा सत्यतेबद्दल खात्री नसेल तर तेथे प्रामाणिकपणे माहिती पूर्ण नाही किंवा क्षमस्व, मला खरंच माहिती नाही किंवा मला यातील गाेष्टी जाणून घेऊन मगच उत्तर देणे पर्याप्त आहे अशा प्रकारची वागणूक प्रशंसनीय असते. कारण कमिशनला ‘गुगल’वाला अधिकारी नकाे असताे ताे एक ‘स्टेट्समन’ पद्धतीचा हवा असताे जाे धाेरणी असू शकताे, फायदा-ताेट्याचा विचार करणारा,सारासार विचार करुन पब्लिक पाॅलिसीचा विचार करणारा एक ‘माणूस’ हवा असताे. अशा मुलाखतीमधून ते उमेदवारातील माणूस शाेधतात. जीपीएससी परीक्षेमध्ये सध्यातरी क्लासA व क्लास B पॅनेल मुलाखत हाेते.

- अॅड. शैलेश कुलकर्णी, फोंडा- गोवा

(लेखक करिअर समुपदेशक आहेत)

मोबाईल : ७८७५४४५३९९