डॉ. निशिता कॉस्मेटिक्स क्लिनिकमध्ये आधुनिक यंत्रसामग्रीमुळे प्रभावी उपचार

पत्रकार परिषदेत


07th October 2021, 11:40 pm
डॉ. निशिता कॉस्मेटिक्स क्लिनिकमध्ये आधुनिक यंत्रसामग्रीमुळे प्रभावी उपचार

फोटो : पत्रकार परिषदेत डावीकडून डॉ. सोनिया वळवईकर, डॉ. निशिता शेठ आणि डॉ. प्रशांत विक्रम. (नारायण पिसुर्लेकर)
प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : पाटो-पणजीतील गेरा इम्पेरियम इमारतीत असलेल्या डॉ. निशिता कॉस्मेटिक्स क्लिनिकमध्ये अत्याधुनिक मशिनद्वारे विविध कॉस्मेटिकची चिकित्सा केली जाणार आहे. यात कुठल्याही सर्जरीशिवाय हेअर ट्रान्सप्लाटेशन, बी. बी. ग्लॉव, चारकोल फेशियल आदी केले जात आहे. २००९ पासून हे क्लिनीक गोव्यात आहे. या काळात अनेकांनी रूट हेअर ट्रन्सप्लाटेशनची सेवा घेतली आहे. हे क्लिनिक ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरले आहे. या क्लिनिकमध्ये अंगावर कायमस्वरूपी काढलेले टॅटू काढून टाकण्यासाठीही उपाय केले जातात, अशी माहिती डॉ. निशिता शेठ यांनी दिली.
क्लिनिकमध्ये गुरुवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी डॉ. सोनिया वळवईकर आणि डॉ. प्रशांत विक्रम हेही उपस्थित होते. यावेळी त्यांनी नवीन मशिनरीबाबत सविस्तर माहिती दिली. त्या म्हणाल्या, क्लिनिकमध्ये अत्याधुनिक मशिनद्वारे होणारे उपचार वेदनारहित आणि तुलनेत किफायतशीर होतात. ग्राहकांचे समाधान होत असल्यामुळे राज्याबाहेरील लोकही क्लिनिकमध्ये उपचारासाठी येत आहेत. विशेषकरून केस गळतीची समस्या असणारे अधिक असतात. त्यांना हेअर ट्रान्सप्लान्टेशन उपचारांनी लाभ होत आहे. ग्राहकांना उपचाराबाबत पूर्ण माहिती दिली जाते. त्यांच्या शंकांचे निरसनही केले जाते.
डॉ. सोनिया वळवईकर म्हणाल्या, प्रत्येकाला सुंदर दिसण्याची इच्छा असते; पण वयानुसार शरिरात बदल होतो. काही जणांना कमी वयातच म्हातारपण येते. अशा वेळी अनेक लोक विश्वासाने आमच्या क्लिनिकमध्ये उपचारासाठी येतात. विशेषतः केसगळतीवर प्रभावी उपचार केले गेले आहेत. आता क्लिनिकमध्ये अत्याधुनिक मशिनरी आणली असून त्याचाही फायदा आमच्या ग्राहकांना मिळणार आहे.