स्व. हरीश झांट्ये यांचे सामाजिक कार्य प्रेरणादायी : पाटणेकर

|
22nd September 2021, 11:34 Hrs
स्व. हरीश झांट्ये यांचे सामाजिक कार्य प्रेरणादायी : पाटणेकर


माजी मंत्री स्व. हरीश झांट्ये यांना जयंतीदिनी अभिवादन करताना सभापती राजेश पाटणेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, आमदार प्रवीण झांट्ये, शंभू भाऊ बांदेकर, प्रेमानंद म्हाब्रे, दयानंद कारबोटकर व इतर.

प्रतिनिधी। गोवन वार्ता

डिचोली : माजी मंत्री स्व. हरीश झांट्ये यांनी गोव्यातील राजकारणात तसेच शिक्षण, सहकार, कला, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान दिले असून गोरगरिबांच्या सुखदुःखात ते सतत सहभागी होऊन त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला. त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन सभापती राजेश पाटणेकर यांनी केले.
माजी मंत्री स्व हरीश (अण्णा) झांट्ये यांच्या जयंती दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी स्व. हरीश झांट्ये एक आदरणीय व्यक्ती होते. त्यांनी सर्वच क्षेत्रात मोठे योगदान दिले असून हजारो लोकांना त्यांनी मदत केली. त्यांचे कार्य कायम स्मरणात राहील, असे त्यांनी सांगितले.
सुलक्षणा सावंत, शंभू भाऊ बांदेकर यांनी हरीश झांट्ये हे प्रत्येक घटकासाठी आधारवड होते, असे सांगितले. प्रवीण झाट्ये यांनी अण्णांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रेमानंद म्हाब्रे, रायू सावंत, रमाकांत आमोणकर, अच्युत गावकर आदींनी विचार मांडले.
यावेळी मंडळ अध्यक्ष दयानंद कारबोटकर तसेच विविध सरपंच, पंच सदस्य, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विश्वास चोडणकर यांनी सूत्रसंचालन केले.