जिओ मार्ट आणि स्मार्ट सुपरस्टोअरचा उद्यापासून ‘फुल्ल पैसा वसूल सेल’

भारतातील सर्वांत मोठा किराणा सेल : १८ ऑगस्टपर्यंत राहणार सुरू


13th August 2021, 12:10 am
जिओ मार्ट आणि स्मार्ट सुपरस्टोअरचा उद्यापासून ‘फुल्ल पैसा वसूल सेल’

मुंबई : जिओ मार्ट आणि स्मार्ट सुपरस्टोअर यांनी किराणा मालाविषयीचा सर्वांत मोठा उत्सव ‘फुल्ल पैसा वसूल सेल’ची घोषणा केली आहे. हा सेल शनिवार, १४ ऑगस्ट ते बुधवार, १८ ऑगस्टपर्यंत जिओ मार्टवर सुरू राहणार आहे. याशिवाय १२००हून अधिक स्टोअर्ससह स्मार्ट सुपरस्टोअर्स, स्मार्ट पॉईंट आणि रिलायन्स फ्रेश येथेही हा सेल सुरू राहील. ग्राहकांची किराणा साहित्यावर मोठी बचत व्हावी, हा या फुल्ल पैसा वसूल सेलचा उद्देश आहे. यावर्षीही या सेलद्वारे मोठ्या प्रमाणात बचत करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ग्राहक पॅकबंद अन्न पदार्थ, दुग्धजन्य उत्पादने, घरगुती आणि वैयक्तिक वापरात लागणाऱ्या वस्तू, कपडे आदी विविध कंपन्यांच्या उत्पादनांच्या खरेदीवर या सेलमधून मोठी बचत करू शकतात.
फुल्ल पैसा वसूल सेलची जाहिरातही हटके असते. या वर्षीच्या जाहिरातीत नामवंत कलाकार सतीश शाह, केतकी दवे, शुभांगी अत्रे, मुकुल चड्डा, अश्लेषा ठाकूर आणि तनिष्क हे झळकले आहेत. ही जाहिरात रेडिओ, टीव्ही, वर्तमानपत्रे, सोशल मीडिया आदींवरून सेल संपेपर्यंत प्रक्षेपित होत राहणार आहे.
विविध कंपन्यांची शाम्पू, चॉकलेट आणि बिस्किटांवर ५० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात आली आहे. सॉफ्ट ड्रिंक्स, नूडल्स, साबण, टूथपेस्ट खरेदीवर कमीत कमी ३३ टक्के सवलत आहे. कपड्या धुण्यासाठीच्या वस्तूंवर ३० टक्के सवलत दिली आहे. १,४७० रुपयांचे बासमती तांदुळ आणि तेल फक्त १,०४९ रुपयांत उपलब्ध आहे. ग्राहक आपली मागणी जिओ मार्टच्या अॅपवरही नोंदवू शकतात. सर्व साहित्य त्यांनी दिलेल्या पत्त्यावर मोफत पोहोच केले जाईल. मोफत घरपोच सेवेसाठी कमीत कमी खरेदीची कोणतीही अट घालण्यात आलेली नाही.
जिओ मार्ट हे रिलायन्न रिटेलचे नवी ऑनलाईन व्यासपीठ बनले आहे. या मार्टची सेवा देशभरातील २००हून अधिक शहरांत सुरू आहे.