मडगावात ९ रोजी पेडणेकर ज्वेलर्सचे उद्घाटन

- दक्षिण गोव्यातील ग्राहकांनाही अनुभवता येणार अस्सल सोनेरी साज

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
05th November 2020, 01:53 am
मडगावात ९ रोजी पेडणेकर ज्वेलर्सचे उद्घाटन

मडगाव : जगन्नाथ गंगाराम पेडणेकर या नामवंत आस्थापनाच्या अद्ययावत शोरूमचे पणजीनंतर आता मठग्रामात आगमन होत आहे. पेडणेकर ज्वेलर्सच्या मडगाव येथील शोरूमचे उद्घाटन सोमवार, ९ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे.

  महाराष्ट्रातील चोखंदळ ग्राहकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केल्यानंतर जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्स आस्थापनाने गोमंतभूमीमध्ये पणजी येथे अद्ययावत शोरूम सुरू केले. गोमंतकीयांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेत आता दक्षिण गोव्यातील मडगावात गोव्यातील पेडणेकर ज्वेलर्सचे दुसरे आस्थापन सुरू केले जात आहे. त्यामुळे पेडणेकर ज्वेलर्सच्या सोन्याच्या दागिन्यांमुळे मठग्रामातील ग्राहकांनाही खरा सोनेरी साज अनुभवता येणार आहे. 

गुणवत्ता, प्रामाणिकपणा व अखंडरीत्या सेवा यासह ग्राहकांची पसंती व ग्राहकांनी पेडणेकर ज्वेलर्सवर दाखवलेला विश्वास हीच आतापर्यंत यशाची किल्ली असल्याचे पेडणेकर ज्वेलर्स समुदातर्फे सांगण्यात येते.            

सुवर्ण घोडदौड अशी...

* जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्स हे सन १९६५ पासून सुवर्ण व्यवसायात असून, मुंबईतील दादर, गोरेगाव, वाशी, डोंबिवली, पनवेल, विरार, मुलुंड आदी ठिकाणी आपली आस्थापने सुरू केलेली आहे. 

* गोव्यातही गेली अनेक वर्षे या आस्थापनांच्यावतीने मडगाव व पणजी येथे प्रदर्शन भरवण्यात आलेली आहेत.

* अल्पावधीत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या पेडणेकर ज्वेलर्सने कोकणातही आपले स्थान भक्कम केले आहे. रत्नागिरी, चिपळूण, सावंतवाडी व गोवा पणजी येथे पेडणेकर ज्वेलर्सची शोरुम सुरू करून ग्राहकांना दर्जेदार सेवा दिली जात आहे. 

......................................................................................................................

मडगाव येथे श्री दामोदार चेंबर्स, दुकान नं. १ ते ५ इजिदोर इमिलिओ बाप्तिस्ता रोड या ठिकाणी आस्थापनाचे उद्घाटन महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य तथा भाजप नेते प्रसाद लाड यांच्या शुभहस्ते केले जाणार आहे.