Goan Varta News Ad

आयएसएलसाठी एफसी गोवा संघ जाहीर

|
29th October 2020, 04:10 Hrs

पणजी :गेल्या आठवड्यात देशांतर्गत हस्तांतरण विंडो कलावधी संपुष्टात आल्यानंतर एफसी गोवाने या सत्रासाठी आपल्या पथकाची यादी इंडियन सुपर लीगकडे (आयएसएल) सुपुर्द केली आहे. प्रत्येक क्लबमध्ये कमीतकमी तीन विकासात्मक खेळाडू असणाऱ्या प्रथम-संघातील ३५ खेळाडूंची नोंद करण्यात येऊ शकते.
सर्व संघांना त्यांच्या संघात किमान पाच आणि जास्तीत जास्त सात परदेशी खेळाडू ठेवण्याची परवनगी आहे. इंडियन सुपर लीगच्या २०२०/२१ हंगामासाठी एफसी गोवाचे पथक खालीलप्रमाणे.
गोलरक्षक : महम्मद नवाज, नवीन कुमार, शुभम धस, डिलन डिसिल्वा. डिफेंडर्स : सॅनसन परेरा, सेरिटन फर्नांडिस, लिअँडर डिकुन्हा, इव्हन गोन्झालेझ (स्पेन), महम्मद अली, जेम्स डोनाची (ऑस्ट्रेलिया), सरीनो फर्नांडिस, आयबनभा डोहलिंग, सेव्हियर गामा. मिडफिल्डर्स : लेनी रॉड्रिग्ज, नेस्टर डायस, एडु बेदिया (स्पेन), प्रिन्स्टन रेबेलो, अल्बर्टो नोगुएरा (स्पेन), ब्रँडन फर्नांडिस, फ्रॅन्की बुम, रेडीम तेलंग, मकन विंकल चोथे, अलेक्झांडर रोमारियो जेसुराज, जॉर्ज ऑर्टिज (स्पेन), फ्लेन गोमेस, सेमिन्लेन डौंगल. फारवर्ड्स : इगोर आंगुलो (स्पेन), आरेन डिसिल्वा, देवेंद्र मुरगावकर, ईशान पंडिता.