राजस्थान खरेदी मेळाव्याला म्हापशात दिमाखात प्रारंभ

म्हापसा टुरिस्ट सभागृहात राजस्थान गार्मेन्ट मेलाचे नुकतेच शानदार उद्घाटन करण्यात आले. काँग्रेसचे उत्तर गोवा अध्यक्ष विजय भिके यावेळी उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते शुभारंभ करण्यात आला.

Story: पणजी : |
17th October 2020, 01:05 am
राजस्थान खरेदी मेळाव्याला म्हापशात दिमाखात प्रारंभ

पणजी : म्हापसा टुरिस्ट सभागृहात राजस्थान गार्मेन्ट मेलाचे नुकतेच शानदार उद्घाटन करण्यात आले. काँग्रेसचे उत्तर गोवा अध्यक्ष विजय भिके यावेळी उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते शुभारंभ करण्यात आला.

यावेळी आस्थापनाचे संचालक महावीर साळगावकर, साळगाव काँग्रेसचे गटाध्यक्ष भोलानाथ घाडी, डिचोलीचे गटाध्यक्ष मेघश्याम राऊत यांची उपस्थिती होती. २ नोव्हेंबरपर्यंत हा मेळा सुरू राहणार आहे, अशी माहिती संचालक महावीर यांनी दिली.  या प्रसंगी महावीर म्हणाले, कोविड काळात विक्र्रीसाठी पुढे आलेले आमचे पहिले आस्थापन आहे. त्यासाठी आम्हाला खूप प्रयत्न करावे लागले. प्रारंभी ग्राहक नसतानाही आम्ही विक्री सुरू केली आहे. तथापि, ग्राहकांचा आम्हाला उदंड प्रतिसाद मिळेल, अशी खात्री आहे. प्रमुख पाहुणे विजय भिके यांनी महावीर यांचे मनापासून कौतुक केले. ते म्हणाले, एका उद्योजकाने अशा प्रकारचे दाखवलेले धैर्य हे आदर्शवत आहे. तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

या मेळ्यात बनारसी सील्क, लखनौ चिकन वर्क, कारपेट कुर्ता, सिल्क साड्या, कॉटन साड्या, बिजापूर सिल्क मटेरियल, चंदर सिल्क पटियाला, बेडशीट, हँड ब्लॉक प्रिंट, ज्वेलरी, बांगड्या आदी लक्षवेधी साहित्य उपलब्ध आहे. ग्राहकांना सदर वस्तू नक्कीच भावतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.