- गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधेसाठी नवे पाऊल
मुंबई : एचडीएफसी बँक आणि अपोलो हॉस्पिटल्सने नुकतीच भागिदारी करत त्यांच्या हेल्दीलाईफ प्रोग्रामची सुरुवात केल्याची घोषणा केलीय. या उपक्रमा अंतर्गत आता अपोलोच्या डिजिटल प्लॅटफॉर्म असलेल्या अपोलो
२४/७ अंतर्गत आरोग्य सुविधा सोपी आणि परवडणारी बनली आहे. हा कार्यक्रम आता एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी विशेषरूपाने तयार करण्यात आला असून ग्राहकांना आता अपोलो २४/७ च्या अंतर्गत मोफत इमर्जन्सी अपोलो डॉक्टर हे मोफत उपलब्ध असतील. त्याच
बरोबर आता अपोलो हॉस्पिटल्समधील उपचारांसाठी सोपे असे वित्तीय पर्यायही उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
या उपक्रमाची डिजिटल सुरुवात करण्यासाठी उपस्थित मान्यवरांमध्ये एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य पुरी, अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपचे चेअरमन डॉ. प्रताप सी रेड्डी, अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपच्या एक्झिक्युटिव्ह व्हाईस चेअरपर्सन शोभना कामीनेनी आणि एचडीएफसी बँकेचे एमडी डेसिग्नेट शशीधर जगदीशन् यांचा समावेश होता.
वैद्यकीय आपात्कालात किंवा आरोग्यपूर्ण राहणीतील सर्वांत मोठे आव्हान म्हणजे विश्वसनीय, गुणवत्तापूर्ण आरोग्यसुविधां बरोबरच सुयोग्य पद्धतीने वित्तीय सहकार्य उपलब्ध होणे. दोन आघाडीचे खेळाडू एकत्र येऊन या दोन्ही संस्थांची पोहोच असल्याचा लाभ घेऊन या समस्येचे सुयोग्य निराकरण होऊ शकेल. भारतातील जवळजवळ ४० टक्के लोकांच्या ३० मिनिटांच्या अंतरावर अपोलो फार्मसी आहे आणि देशातील ८५ टक्के जिल्ह्यांमध्ये एचडीएफसी बँकेची शाखा आहे या दोन्ही संस्थांच्या क्षमतेचा उपयोग केल्यास सध्याच्या ६५ दशलक्ष एचडीएफसी बँकेच्या ग्राहकां बरोबरच नवीन जोडल्या जाणार्या ग्राहकांनाही या भागिदारीचा लाभ मिळू शकेल.
हेल्दी लाईफ विषयी संपूर्ण माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा https://bit.ly/3jElvEb
आरोग्य सेवा देण्याबाबत सादेचा आम्ही मान राखत आहोत. ही नवीन सुरुवात करताना मी खूप आनंदी असून, याचा मला अभिमान वाटतो.
- आदित्य पुरी, एचडीएफसी बँकेचे एमडी.