Goan Varta News Ad

ऑल न्यू बीएमडब्ल्यू आर-१८ दुचाकी सादर

बीएमडब्ल्यू मोटोरार्डने देशात ऑल न्यू बीएमडब्ल्यू आर-१८ ही क्रुझर सेगमेंटमध्ये दुचाकी सादर केली आहे. अत्यंत देखणी आणि ताकदवर अशी दुचाकी तरुणाईला नक्कीच भावेल, असा विश्वास कंपनीला आहे.

Story: पणजी : |
25th September 2020, 12:42 Hrs
ऑल न्यू बीएमडब्ल्यू आर-१८ दुचाकी सादर


पणजी : बीएमडब्ल्यू मोटोरार्डने देशात ऑल न्यू बीएमडब्ल्यू आर-१८ ही क्रुझर सेगमेंटमध्ये दुचाकी सादर केली आहे. अत्यंत देखणी आणि ताकदवर अशी दुचाकी तरुणाईला नक्कीच भावेल, असा विश्वास कंपनीला आहे. 

 या मॉडेल्सची किंमत १८ ते २१ लाख रुपयांपर्यंत आहे. तंत्रज्ञान व डिझाईनच्या बाबतीत बीएमडब्ल्यूने नेहमीच आपली स्वतंत्र छाप पाडली आहे. न्यू बीएमडब्ल्यू आर १८ ही दुचाकीही त्याच पठडीतील आहे. या दुचाकीला मोठे बॉक्सर इंजीन असून, त्याद्वारे चालक अतिव आनंद मिळवू शकतो. डिझाईनमध्ये काळानुरूप बदल करण्यात आले असून, सदर दुुचाकी तरुणांना नक्कीच भुरळ घालेल. या संदर्भात बीएमडबल्यू इंडिया ग्रुपचे अध्यक्ष विक्रम पावाह म्हणाले, सध्याच्या काळातील ट्रेन्ड विचारात घेऊन सर्वोत्तम निर्मिती करण्यात आली आहे. त्यासाठी खास आधुनिक तंत्रज्ञान, आकर्षक रंगसंगती याचा वापर करण्यात आला आहे. ग्राहकांना सदर मॉडेल नक्की आवडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.