Goan Varta News Ad

टोयोटाची अर्बन क्रूजर ग्राहकांच्या सेवेत दाखल

एसयूवी सेगमेंटमध्ये लौकीक वाढवण्यासाठी तसेच तरुण ग्राहकांची संख्या वाढविण्यासाठी, टोयोटा किर्लोस्कर मोटरने त्यांची नवीनतम टोयोटा अर्बन क्रुजर सादर केली आहे.

Story: पणजी : |
25th September 2020, 12:33 Hrs
टोयोटाची अर्बन क्रूजर ग्राहकांच्या सेवेत दाखल
पणजी : एसयूवी सेगमेंटमध्ये लौकीक वाढवण्यासाठी तसेच तरुण ग्राहकांची संख्या वाढविण्यासाठी, टोयोटा किर्लोस्कर मोटरने त्यांची नवीनतम टोयोटा अर्बन क्रुजर सादर केली आहे. टोयोटा अर्बन क्रूजर ही टोयोटा ग्लान्झा या प्रीमियम हॅचबॅकच्या भरघोस यशानंतर जागतिक टोयोटा-सुझुकी युतीच्या अंतर्गत भारतात लाँच केले जाणारे दुसरे मॉडेल आहे.
नवीन अर्बन क्रुजर आजच्या यशस्वी तरुणांसाठी जे आकांक्षी आहेत आणि रिस्पेक्टस्टँड्सटॉल या संकल्पनेवर विश्वास करतात, अशा तरुण पिढीसाठी डिझाइन करण्यात आले आहे. बहुप्रतिक्षित कॉम्पॅक्ट एसयूवी एका कार्यक्रमाच्या आयोजना दरम्यान सादर करण्यात आली. यावेळी टीकेएमचे व्यवस्थापकीय संचालक मसाकाजू योशिमुरा, नवीन सोनी, सीनियर वाइस प्रेसिडेंट, सेल्स अँड सर्विस आणि तदाशी असाजुमा, व्हाइस प्रेसिडेंट, सेल्स अँड मार्केटिंग हे देखील उपस्थित होते. यावेळी यूथ आयकॉन  आयुष्मान खुराना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी देखील या कार्यक्रमामध्ये भाग घेतला. नवीनतम अर्बन क्रुजरमध्ये नवीन शक्तिशाली के-सिरीज इंजिन आहे. हे १.५ लीटरचे चार सिलिंडरचे पेट्रोल इंजीन आहे, ज्यामध्ये इंधन कार्यक्षमतेसाठी मॅन्युअल ट्रांसमिशन (एमटी) १७.०३ केएमपीएल आणि ऑटोमेटिक ट्रांसमिशन (एटी) १८.७६ केएमपीएल असे दोन पर्याय देखील उपलब्ध आहेत. 

कॉम्पॅक्ट एसयूवी क्षेत्रात आमचा प्रवेश अशा वेळी झाला आहे, जेव्हा अँडव्हान्स बॉडी स्ट्रक्चर आणि रोडवर उत्कृष्ट उपस्थितीमुळे आम्हाला चांगली लोकप्रियता मिळाली आहे. आम्ही टोयोटा कुटुंबात नवीन ग्राहकांचे, विशेषत: तरूणांचे स्वागत करतो. 
- टीकेएमचे व्यवस्थापकीय 
 संचालक मसाकाजू योशिमुरा,