Goan Varta News Ad

सॅमसंगकडून खास ऑफर

- १५ टक्क्यांपयर्र्र्ंत कॅशबॅक, ईझी ईएमआयचा पर्याय

|
19th August 2020, 02:36 Hrs
सॅमसंगकडून खास ऑफर

पणजी : गणेश चतुर्थीचा सण अधिक चांगल्या प्रकारे साजरा करता यावा यासाठी सॅमसंग इंडिया या देशभरातील सर्वांत विश्वसनीय ग्राहकोपयोगी ब्रॅन्डने आपल्या टेलिव्हिजन्स, रेफ्रिजरेटर्स, स्मार्ट ओव्हन्स, वॉशिंग मशीन्स आणि एअर कंडिशनर्सवर आकर्षक ऑफर्सची घोषणा केली आहे. या ऑफर्समध्ये आकर्षक डील्स, आकर्षक फायनान्स स्कीम्स जसे १५ टक्के कॅशबॅक, ९९० रुपयांपासून पुढे सुरू होणार्‍या ईझी ईएमआय सारख्यांचा समावेश असून या ऑफर्स ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत सुरू राहणार आहेत. अनोख्या अशा ऑफर्स मध्ये ग्राहकांना विविध उत्पादनांच्या खरेदीबरोबर सुनिश्चित लाभ देण्यात येत असून, याकरता उत्पादनांमध्ये सॅमसंग क्यूएलईडी टिव्हीज, ४ के यूएचडी टिव्हीज, स्मार्ट टिव्हीज, स्पेसमॅक्स फॅमिली हब रेफ्रिजरेटर, साईड बाय साईड आणि फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर्स, फ्लेक्सवॉश वॉशिंग मशीन्स, डवॉश वॉशिंग मशीन्स, फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लोड आणि टॉप लोड वॉशिंग मशीन्स, स्मार्ट ओव्हन्स आणि विंड फ्री एअरकंडिशनर्स व अन्य उत्पादनांचा समावेश आहे.  आपल्या ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन श्रेणीत वाढ करत सॅमसंगने नुकतेच आपल्या टिव्हीचा आवाज सुधारण्यासाठी साऊंडबार्स सुरू केले असून यांत युनिक क्यू सिंफनी वैशिष्ट्यांचा समावेश आहे. या ऑफरच्या कालावधीत जे ग्राहक सॅमसंग क्यूएलईडी ८के टिव्हीज खरेदी करतील त्यांना ७७,९९९ रूपये किंमतीचा सॅमसंग गॅलेक्सी एस २०+  मोफत देण्यात येणार आहे. त्याच बरोबर ग्राहकांना काही विशिष्ट क्यूएलईडी टिव्हीजच्या पॅनलसाठी १० वर्षांची नो स्क्रीन बर्न इन वॉरंटी देण्यात येणार आहे.