ग्रामपंचायतींच्या माध्यमातून १७०० कुटुंबाना मास्क, सॅनिटायझरचे वितरण

कोविड-१९ महामारीच्या काळात स्थानिकांना मदत करण्याच्या उद्देशातून ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने गोव्यातील कोलवाळ गावातील १,७०० कुटुंबांना कापडी मास्क आणि सॅनिटायझरचे वितरण केले. ग्लेनमार्कच्या या मदतकार्याला गरजू कुटुंबांची निवड करणे आणि त्यांना ही आरोग्यसुरक्षा साहित्याचे वितरण करणे याकामी ग्रामपंचायतीचे सहकार्य लाभले.


13th August 2020, 12:34 am
ग्रामपंचायतींच्या माध्यमातून १७०० कुटुंबाना मास्क, सॅनिटायझरचे वितरण

पणजी : कोविड-१९ महामारीच्या काळात स्थानिकांना मदत करण्याच्या उद्देशातून ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने गोव्यातील कोलवाळ गावातील १,७०० कुटुंबांना कापडी मास्क आणि सॅनिटायझरचे वितरण केले. ग्लेनमार्कच्या या मदतकार्याला गरजू कुटुंबांची निवड करणे आणि त्यांना ही आरोग्यसुरक्षा साहित्याचे वितरण करणे याकामी ग्रामपंचायतीचे सहकार्य लाभले.
कोविड-१९चा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे महत्त्व ओळखून ग्लेनमार्कने मदतकार्याची ही मोहीम चालवत या महामारीला रोखण्यासाठी स्थानिकांना पाठबळ देण्याचे काम केले आहे. गत दोन महिन्यांमध्ये ग्लेनमार्कच्या गोवा प्रकल्पाने पिर्ण आणि डिचोली येथील करुणालय आणि संत गाडगे महाराज आश्रम या वृद्धाश्रमांना, आसरो आणि मार्गारेट बॉस्को बाल संस्था या बालगृहांना तसेच गिरी-गोवा येथील गरीब कुटुंबांना मदत पुरवली आहे. १,५०० स्थालांतरित मजुरांना त्यांच्या मूळ राज्यांत रेल्वेद्वारे परत पाठवताना अन्नपाकिटे आणि पाणीही पुरवले आहे. मोठ्या आर्थिक संकटात असलेल्या या कुटुंबांना ग्लेनमार्कची ही मदत मोलाची ठरली असून पुन्हा सामान्य स्थितीकडे जाण्यासाठी उमेद देऊन गेली आहे. राज्यात या महामारीविरुद्धच्या लढ्यासाठी ग्लेनमार्कने मुख्यमंत्री निधीस २० लाख रुपयांची मदत दिलेली आहे.
या संकटकाळात कायदा सुव्यवस्था नियंत्रित करणाऱ्या यंत्रणेच्या योगदानाची दखल घेऊन ग्लेनमार्कचा सीएसआर विभाग असलेल्या ग्लेनमार्क फाउंडेशनने राइझ इन्फिनिटी फाउंडेशनच्या सहकार्यातून सामान्य त्वचाविकारांवर मात करण्यासाठी पोलिसांना कँडिड पावडर बॉक्सची मदत केली.
__
कोट
ग्लेनमार्कने सातत्याने सकारात्मक दृष्टिकोनातून स्थानिकांना मदत पुरवण्याचे काम केले आहे. अशा प्रकारच्या उपक्रमातून महामारीचा संसर्ग रोखण्याच्या प्रयत्नांना चालना मिळेल, अशी आम्हाला आशा आहे. या मदतकार्यासाठी आम्हील ग्लेनमार्कच्या व्यवस्थापनाचे आभारी आहोत.
_ नित्यानंद कांदोळकर, सरपंच, कोलवाळ