Goan Varta News Ad

एसयूव्ही टोयोटा अर्बन क्रूजरसह कॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणीत प्रवेश

भारतात उत्सवाच्या हंगामात सादर करण्याची योजना

|
07th August 2020, 12:27 Hrs
एसयूव्ही टोयोटा अर्बन क्रूजरसह कॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणीत प्रवेश

बंगळुरू : टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) ने टोयोटा अर्बन क्रूजरसह कॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणीत प्रवेशाची घोषणा केली आहे. नवीन अर्बन क्रूजरमध्ये शहरी वैशिष्ट्य आहे, जे त्याला इतरांपेक्षा भिन्न बनविते. अर्बन क्रूजर विवेकी ग्राहकांना आवडेल. कॉम्पॅक्ट एसयूव्हीची भारतातील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनी सणाच्या हंगामात त्यांच्या श्रेणीतील कॉम्पॅक्ट एसयूव्ही सादर करत आहे.
कॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणीत प्रवेशाबद्दल टिप्पणी करताना सेल्स अँड सर्व्हिसचे सीनियर व्हाइस प्रेसिडेंट नवीन सोनी म्हणाले, टोयोटा अर्बन क्रूझर या सणासुदीच्या हंगामात सादर करण्याच्या आमच्या योजनेची घोषणा कारण्याबद्दल आम्ही खूप उत्सुक आहोत. टोयोटा किर्लोस्कर मोटरने नेहमी त्यांच्या ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. विकसनशील ग्राहकांच्या गरजा भागविण्यासाठी टोयोटा अर्बन क्रूजरचा हा आणखी एक प्रयत्न आहे. आम्ही आशा करतो की, अर्बन क्रूजर आम्हाला अशा ग्राहकांच्या नव्या समूहाचे स्वागत करण्याची संधी देईल, जे आयुष्यात टोयोटा एसयूव्ही मिळविण्याची आकांक्षाच ठेवत नाहीत, तर टोयोटाच्या विक्री आणि विक्रीनंतरच्या सेवांचे जागतिक मानकेदेखील अनुभवू इच्छितात. आम्ही पुढील काही दिवसांत कार आणि प्रक्षेपणाबद्दल अधिक माहिती जाहीर करू.