विमान अपहरणाचा कट उधळणाऱ्या कॅप्टन स्मिथ मच्छर यांना अशोकचक्र पुरस्कार देण्याची मागणी

अनेकांकडून मागणी : शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) खासदार मिलिंद देवरा यांचा पंतप्रधानांशी पत्रव्यवहार; विमान अपहरणाचा प्रयत्न धाडसाने हाणून पाडणारे पायलट कॅप्टन स्मिथ मच्छर यांना देशातील सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार ‘अशोकचक्र’ प्रदान करावा, अशी मागणी पुढे आली आहे. त्यांच्या प्रसंगावधानामुळे आणि धैर्यामुळे मोठा धोका टळला. आणि १७० प्रवाशांचे प्राण वाचले. ही मोठी कामगिरी असून, त्यांच्या कामगिरीला उचित सन्मान होणे आवश्यक असल्याचे मत विविध स्तरातून व्यक्त होत आहे. जगभरातील प्रसिद्धी माध्यमांनीही त्यांच्या कार्याची दखल घेत स्तुुतीसुमनांचा वर्षाव सुरू केला आहे. त्यामुळे पायलट कॅप्टन ‌स्मिथ मच्छर आपल्या कामगिरीने जागतिक हिरो ठरले आहेत.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
विमान अपहरणाचा कट उधळणाऱ्या कॅप्टन स्मिथ मच्छर यांना अशोकचक्र पुरस्कार देण्याची मागणी

मुंबई : विमान अपहरणाचा प्रयत्न धाडसाने हाणून पाडणारे पायलट कॅप्टन स्मिथ मच्छर यांना देशातील सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार ‘अशोकचक्र’ प्रदान करावा, अशी मागणी पुढे आली आहे. त्यांच्या प्रसंगावधानामुळे आणि धैर्यामुळे मोठा धोका टळला. आणि १७० प्रवाशांचे प्राण वाचले. ही मोठी कामगिरी असून, त्यांच्या कामगिरीला उचित सन्मान होणे आवश्यक असल्याचे मत विविध स्तरातून व्यक्त होत आहे. जगभरातील प्रसिद्धी माध्यमांनीही त्यांच्या कार्याची दखल घेत स्तुुतीसुमनांचा वर्षाव सुरू केला आहे. त्यामुळे पायलट कॅप्टन ‌स्मिथ मच्छर आपल्या कामगिरीने जागतिक हिरो ठरले आहेत.

शिवसेना नेते तथा खासदार मिलिंद देवरा यांनी पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कॅप्टन ‌स्मिथ मच्छर यांना अशोकचक्र देण्याची मागणी केली आहे. कॅ. मच्छर हे मुंबईचे असून, त्यांच्याबद्दल आम्हाला गर्व आहे. यापूर्वी १९८६ साली विमानाचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला असता नीरज भानोत यांनी बजावलेल्या कामगिरीबद्दल त्यांना अशोकचक्र बहाल केल्याचे खासदार देवरा यांनी नमूद केले आहे.

जगभरातून कौतुक

दरम्यान, विमानाच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झालेल्या परिस्थितीत कॅप्टन मच्छर यांनी दाखवलेल्या धैर्याचे जगभरातून कौतुक होत आहे. प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयाची दखल घेण्याची मागणी करण्यात येत आहे. या घटनेत त्यांनी संकटाच्या परिस्थितीत संयम राखत विमानाचे सुरक्षित नियंत्रण ठेवले आणि अपहरणाचा प्रयत्न निष्फळ ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

कॅप्टन मच्छर यांच्या शौर्याची योग्य दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना अशोकचक्राने सन्मानित करावे, अशी मागणी अनेकांकडून करण्यात येत आहे. त्यांच्या धाडसी कृतीमुळे विमानातील प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित होण्यास मदत झाली, असेही या मागणीत नमूद करण्यात आले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद

दरम्यान, नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कॅप्टन मच्छर यांच्याशी संवाद साधत त्यांच्या कार्याचे, शौर्याचे व धैर्याचे कौतुक केले आहे. कठीण प्रसंगात सर्व भारतीय सोबत असल्याचे सांगितले आहे व पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दाखवली आहे. 

हेही वाचा
सर्व पहा