भारतीय निवडणूक आयोगाने जारी केले एसआरआरचे सुधारित वेळापत्रक

गोव्यासह १२ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांत आता १ जानेवारी २०२६ या तारखेची अर्हता गृहीत धरून एसआयआर कार्यक्रम पुढे नेला जाईल.

Story: प्रतिनिधी । पणजी |
just now
भारतीय निवडणूक आयोगाने जारी केले एसआरआरचे सुधारित वेळापत्रक

पणजी: भारत निवडणूक आयोगाने गोवा, गुजरात, केरळ, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, पद्दुचेरी, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार तसेच छत्तीसगडमध्ये मतदार एसआयआरचे सुधारित वेळापत्रक जारी केले आहे.  निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, यापूर्वीच्या आदेशाचे अधिक्रमण करत आयोगाने सुरू असलेल्या एसआयआरचे वेळापत्रक बदलले आहे. गोव्यासह १२ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांत आता १ जानेवारी २०२६ या तारखेची अर्हता गृहीत धरून एसआयआर कार्यक्रम पुढे नेला जाईल. 


एसआयआरचे सुधारित टप्पे

या सुधारित कार्यक्रमानुसार, मतदार यादी पुनरीक्षणाच्या महत्त्वाच्या टप्प्यांचा तपशील निश्चित करण्यात आला आहे. मतदारांची गणना आणि मतदान केंद्रांचे तर्कसंगतीकरण/पुनर्रचना करण्याचे काम गुरुवार ११ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करावे लागणार आहे. त्यानंतर मतदार यादीचा कच्चा मसुदा १२ डिसेंबर २०२५ ते १५ डिसेंबर २०२५ या कालावधीत तयार होईल.

मतदार यादीचा मसुदा मंगळवार १६ डिसेंबर २०२५ रोजी प्रकाशित केला जाईल. मसुदा प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिक आणि राजकीय पक्ष १६ डिसेंबर २०२५ पासून १५ जानेवारी २०२६ पर्यंत दावे आणि आक्षेप दाखल करू शकतील. दाखल झालेल्या दावे आणि आक्षेपांची तपासणी, सुनावणी आणि निर्णय ७ फेब्रुवारी २०२६ (शनिवार) पर्यंत निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांकडून (EROs) एकाच वेळी पूर्ण केले जाणार आहे.

या सर्व प्रक्रियेनंतर, मतदार यादीतील आरोग्य मापदंडांची तपासणी करून अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी १० फेब्रुवारी २०२६ पर्यंत घेणे आवश्यक आहे. शेवटी, या सर्व प्रक्रियेनंतर १४ फेब्रुवारी २०२६ (शनिवार) रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित केली जाईल. या सुधारित वेळापत्रकानुसार संबंधित सर्व अधिकारी आणि नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आयोगाने निर्देश दिले आहेत.


हेही वाचा