अमेठी, रायबरलेलीबाबत अजून निर्णय नाहीच

प्रियांका-राहुल यांच्या उमेदवारीबाबत मल्लिकार्जुन खरगे घेणार निर्णय

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
28th April, 12:02 am
अमेठी, रायबरलेलीबाबत अजून निर्णय नाहीच

नवी दिल्ली : देशभरात दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर अखेर शनिवारी (२७ एप्रिल) रात्री काँग्रेस निवडणूक समितीची दुसरी बैठक झाली. यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह बडे नेते सहभागी झाले होते. उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेली या जागांसाठी उमेदवार निश्चित झाले नसल्याचे वृत्त आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत अमेठी आणि रायबरेलीच्या जागांसाठीच्या उमेदवारांच्या नावांवर विचारमंथन झाले, मात्र उमेदवारांना मंजुरी मिळू शकली नाही. बैठकीत सीईसी सदस्यांनी राहुल गांधींना अमेठीतून आणि प्रियंका गांधींना रायबरेलीतून निवडणूक लढवण्याची विनंती केली. मात्र, हा निर्णय काँग्रेस अध्यक्षांवर सोडण्यात आला आहे.

उमेदवारांच्या नावांवर विचारमंथन तीव्र काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीबाबत सर्वांच्या नजरा अमेठी आणि रायबरेलीच्या जागांवर लागल्या होत्या. मात्र, यावर कोणताही निर्णय न झाल्याने संशयाचे वातावरण कायम आहे. राहुल गांधी पुन्हा एकदा अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवू शकतात, असे मानले जात आहे.

त्याचवेळी, सोनिया गांधींच्या राज्यसभेवर जाण्याने रिक्त झालेल्या रायबरेलीच्या जागेवर प्रियांका गांधी निवडणूक लढवतील अशी अटकळ बांधली जात आहे. दरम्यान, अमेठीमध्ये अनेक ठिकाणी प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या नावाचे पोस्टर्सही लागले आहेत.

सीईसी बैठकीपूर्वी पत्रकार परिषदेत मल्लिकार्जुन खरगे यांनाही याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा उमेदवार निश्चित झाल्यावर जाहीर करू, असे ते म्हणाले होते. यास थोडा वेळ लागेल.

भाजपचा राहुल गांधींवर हल्लाबोल !

अमेठीतून राहुल गांधी यांच्या उमेदवारीवरून भाजप सातत्याने काँग्रेसवर हल्लाबोल करत आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांचा अमेठीमधून पराभव करणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींनी पराभवाच्या भीतीने अमेठीतून निवडणूक लढवल्याचा आरोप केला आहे. मात्र, येथून राहुल गांधी यांना उमेदवारी देण्याची मागणी स्थानिक काँग्रेस नेते सातत्याने करत आहेत.

हेही वाचा