वृद्ध सायकलस्वाराला धडक; दुचाकी चालकाविरोधात गुन्हा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
10th May, 01:27 pm
वृद्ध सायकलस्वाराला धडक; दुचाकी चालकाविरोधात गुन्हा

मडगाव : होंडा एव्हिएटर दुचाकी घेऊन जात असताना संशयित जोसेफा फर्नांडिस हिने सायकलवरून जाणार्‍या शिवाप्पा तेली (६१) या वृद्धाला कट्टो-फातर्पा येथे धडक दिली. सायकलस्वार तेली यात जखमी झाल्याने कुंकळ्ळी पोलिसांनी जोसेफाच्या विरोधात गुन्हा नोंद केलेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित जोसेफा फर्नांडिस या आपल्या ताब्यातील होंडा एव्हिएटर दुचाकी घेऊन बाळ्ळीवरून फातर्पाच्या दिशेने जात असताना कट्टो फातर्पा येथील चंदन जनरल स्टोअर्सजवळ सायकलस्वार शिवाप्पा गिरमाला तेली (रा. कट्टो, फातर्पा) यांना धडक दिली. ही घटना ६ मे रोजी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातात तेली यांच्या डोक्याला व शरीराच्या इतर ठिकाणी जखमा झाल्या. याप्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी संशयित जोसेफा फर्नांडिस विरोधात बेदरकारपणे गाडी चालवून इतरांचा जीव धोक्यात घातल्याप्रकरणी गुन्हा नोंद केलेला आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक डायगो ग्रॅसिअस यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.