केळबाय-कुर्टीत घराच्या छपरावर कोसळला माड

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
10th May, 02:51 pm
केळबाय-कुर्टीत घराच्या छपरावर कोसळला माड

केळबाय-कुर्टी येथे घराची पाहणी करताना सरपंच हरीश नाईक.

फोंडा : केळबाय-कुर्टी येथील मंदार गावडे यांच्या घरावर गुरुवारी सकाळी माड कोसळून घराच्या छप्पराचे नुकसान झाले. माड कोसळल्याने मंदार गावडे यांना अंदाजे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. फोंडा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी माड बाजूला केला. कुर्टी पंचायतीचे तलाठी यांनी पंचनामा केला आहे.

मंदार गावडे यांच्या घराजवळ असलेला माड गुरुवारी घराच्या छप्परावर कोसळला. त्यामुळे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सरपंच हरीश नाईक यांनी शुक्रवारी सकाळी मंदार गावडे यांच्या घराची पाहणी केली. त्यावेळी अधिक माहिती देताना सरपंच हरीश नाईक यांनी पंचायततर्फे गावडे कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात येईल. हा माड धोकादायक स्थितीत घराजवळ उभा होता. पंचायतीच्या तलाठ्या मार्फत पंचनामा करण्यात आला असल्याचे सांगितले.