आणखी एक अपघात... टेम्पोचालक सुदैवानेच बचावला

कोने-प्रियोळ येथे टेम्पोची कंटेनरला धडक

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
18th September 2023, 07:54 pm
आणखी एक अपघात... टेम्पोचालक सुदैवानेच बचावला

कोने -प्रियोळ येथे कठड्यावर आदळलेला टेम्पो.

फोंडा : फोंडा परिसरात अपघातांचे सत्र सुरूच असून कोने-प्रियोळ येथील राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो व कंटेनर यांच्यात झालेल्या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला. सदर अपघात दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास घडला असून फोंडा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला आहे.
जीए ०६ टी ८४१३ क्रमांकाचा टेम्पो फोंडा येथून म्हार्दोळच्या दिशेने जात होता. धोकादायक वळणावर पोहोचताच समोरून येणाऱ्या जीए ०५ टी ५८०१ क्रमांकाच्या कंटेनरला टेम्पोची धडक बसली. त्यानंतर टेम्पो रस्त्याच्या बाजूला जाऊन कठड्यावर आढळला. यात टेम्पोच्या कॅबिनचा चुराडा झाला, तर चालक किरकोळ जखमी झाला. अपघातानंतर मार्गावरील वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम झाला. फोंडा वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.