साखळीत गोवा कन्झ्युमर एक्स्पो

हरवळे येथे ११ ऑक्टोबरपर्यंत सुरू : विविध वस्तूंचे ८० स्टॉल्स


07th October 2021, 11:52 pm
साखळीत गोवा कन्झ्युमर एक्स्पो

फोटो : गोवा कन्झ्युमर एक्स्पो
__
पणजी : हरवळे साखळी येथे प्रथमच ‘गोवा कन्झ्युमर एक्स्पो’ हे गोव्यातील सुप्रसिद्ध प्रदर्शन १ ऑक्टोबरपासून सुरू झाले आहे. विविध वस्तूंची सुमारे ८० दालने (स्टॉल्स) या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. ११ ऑक्टोबरपर्यंत सकाळी १०.३० ते रात्री ८ या वेळेत हे प्रदर्शन शिवशक्ती स्टील ट्रेडर्स समोर, मारुती सुझुकी सर्व्हिसनजीक, प्रतापनगर येथे सुरू राहणार आहे.
या प्रदर्शनात कपडे, भांडी, कारपेट, सौंदर्यप्रसाधने, खेळणी, चप्पल, इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू, खाद्यपदार्थ आदींचे स्टॉल्स आहेत. दसरा आणि दीपावलीच्या पार्श्वभूमीवर खरेदीवर मोठी सूटही दिली जात आहे. लहान मुलांसाठीचे मनोरंजन आणि विविध खेळही या प्रदर्शनाचे आकर्षण राहिले आहे. या प्रदर्शनात सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंग यांसह कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जात आहे. या प्रदर्शनाला नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन खरेदीचा आनंद लुटावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.