वीज प्रकल्प उभारताना वन्यजीव रक्षणाला प्राधान्य

तमनार कंपनीच्या आराखड्यातून स्पष्ट


03rd March 2021, 11:19 pm
वीज प्रकल्प उभारताना वन्यजीव रक्षणाला प्राधान्य

पणजी : वन्यजीवन संरक्षण कायद्यानुसार संरक्षित क्षेत्र ५० हेक्टरांहून कमी असेल तर पर्यावरणावरील प्रभाव मूल्यांकन (बीआयए) हाती घेणे बंधनकारक नाही. तमनार वीजवाहिन्या गोव्यातील अभयारण्याच्या ज्या क्षेत्रातून जात आहेत ते क्षेत्र केवळ ११.५४ हेक्टर इतकेच आहे. तरीही गोवा तमनार ट्रान्मिशन प्रोजेक्ट लिमिटेड (जीटीटीपीएल) कंपनीने स्वतःहून बीआयए अहवाल तयार करण्याचे काम २०१८ सालीच घेतले होते. त्यानंतर जैवविविधता व्यवस्थापन योजनाही आखली आहे. या विषयीचा आराखडा २०१९ मध्ये प्रकाशित केला आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे.
हा प्रकल्प पर्यावरणास बाधक असल्याचा आरोप काहीजण वारंवार करत आहेत. यावर कंपनीने आपली बाजू स्पष्ट केली आहे. गोव्याच्या विजेचा वाढत्या मागणीचा प्रश्न सोडवण्यासाठी वीज मंत्रालयाने २०१५ मध्‍ये जीटीटीपीएल कंपनीला ट्रान्मिशन लाइन कॉरिडॉरसाठी मान्यता दिली होती. कायदेशीर बंधने नसतानाही जैवविविधतेला समावून घेत प्रकल्प, विकास, नियोजन करण्यावर कंपनीने भर दिला. त्यासाठी बीआयए अहवाल तयार करून जैवविविधता व्यवस्थापन आराखडाही बनवला आहे. २०१९ सालीच हा आराखडा सार्वजनिक करण्यात आला आहे. सध्या https://www.gttpl.co.in/downloads/ या संकेतस्थळावर तो वाचता येईल, असे कंपनीने म्हटले आहे.
वन्यजीव रक्षणासाठी योजलेले उपाय
- प्राण्यांच्या संरक्षणासाठी सबस्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर लहान पुलांसारख्या रचना बांधल्या जातील, जेणेकरून प्राण्यांना सुरक्षितपणे ये-जा करता येईल.
- कॉरिडॉरच्या मार्गातील कंडक्टर्सवर पक्ष्यांना दूर ठेवण्यासाठीचे बर्ड डायव्हर्स बसविण्यात येतील. टॉवर्सवर पक्षी बसू नयेत, यासाठी पर्च रिजेक्टर्स बसले जातील.
- जमिनीवर प्राण्यांच्या मुक्त वावराला मुभा असेल व टॉवर्सची उंची ४५-५४ मीटर्स इतकी असल्याने पक्ष्यांच्या हालचालींवर कमीत-कमी परिणाम होईल.

हेही वाचा