- कर्नाटक दूध संघाचे एमडी खान यांची माहिती
पणजी : कर्नाटकातील ख्यातनाम दुग्धोत्पादक कंंपनी नंदिनीने गोव्यात मोठ्या प्रमाणात विस्तार करावयाचे ठरवले आहे. त्या अनुषंगाने विशेष नियोजन करण्यात आले असून, संपूर्ण राज्यात नवी आस्थापने सुरू करण्यात येणार आहेत. याबाबत कर्नाटक दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक उबेदुल्ला खान यांनी माहिती दिली.
गोकाक शहरात अद्ययावत नंदिनी दूध पार्लरचे नुकतेच उद्घाटन झाले. या कार्यक्रमावेळी त्यांनी वरील माहिती दिली. याप्रसंगी कर्नाटक दूध संघाचे अध्यक्ष भालचंद्र जारकीहोळी व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी खान पुढे म्हणाले, गोव्यात दररोज ४५ हजार लीटर दूर वितरित करण्यात येते. मात्र, करोनाच्या काळात ह्यात सुमारे ५० टक्के घट झाली आहे. या स्थितीतून बाहेर येण्यासाठी आवश्यक त्या योजना राबविण्यात येणार आहेत. त्यातूून गोव्यातील नंदिनीच्या वितरकांना उपयोग होईल. दुग्धजन्य पदार्थ निर्मितीत नंदिनीचा खास लौकीक असून पेढा, कुंदासह ६० हून अधिक प्रकार ग्राहकांच्या पसंतीस पडत आहेत. गोमंतकात नवे वितरक नेमण्यासोबत वाहतूक व्यवस्थेत वाढ करण्यात येणार आहे. नंदिनीचा व्यवसाय वाढल्यास त्याचा शेतकर्यांना फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी अध्यक्ष भालचंद्र जारकीहोळी यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी अन्य मान्यवर उपस्थित होते.