काकोडे ट्रेडिंग कंपनीचे ऑनलाईन पोर्टल

बांधकाम साहित्यविषयी खरेदी-विक्रीसाठी खास सुविधा


28th October 2020, 12:13 am

पणजी : बांधकाम क्षेत्रासाठी लागणारे सर्व प्रकारचे साहित्य आणि हार्डवेअर उपकरणांचे गोव्यातील ख्यातनाम वितरक काकोडे ट्रेडिंग एपीपी यांच्यावतीने दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर खास ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. www. Myupgrade.in असा त्याचा युआरएल पत्ता आहे. काकोडे ट्रेडिंगचे संस्थापक रवींद्रनाथ काकोडे यांच्या हस्ते मडगावात पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला.
सध्याचा करोना महामारीचा हा काळ उद्योजकांसाठी अत्यंत कठीण ठरत आहे. मात्र, त्यात येणार्‍या समस्यांवर मात करत ग्राहकांच्या खास सोईसाठी त्यांच्यापर्यंत ऑनलाईन पद्धतीने पोहोचण्याचे आम्ही ठरवले आणि त्या पार्श्वभूमीवर आम्ही खास पोर्टल तयार केले. त्या माध्यमातून खरेदी व विक्री होऊ शकणार आहे, असे काकोडे ट्रेडिंगचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण काकोडे यांनी सांगितले. त्या संदर्भात त्यांनी फेसबूकवर पोस्टही केली आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व्यवसायाशी निगडित बाबी ऑनलाईन होणे अपेक्षित आहे. अशा विचारातून आम्ही पुढे पाऊल टाकत आहोत, असेही प्रवीण काकोडे यांनी सांगितले. याप्रसंगी काकोडे यांनी जागतिक पातळीवर सध्याच्या स्थितीचा वेेध घेत बांधकाम व्यवसाय व एकूणच व्यावसायिकांसमोरी आव्हानाबाबत ऊहापोह केला. देशाच्या अर्थव्यवस्थेला बांधकाम व्यवसाय कशा पद्धतीने महत्त्वाचा ठरतो, याबाबतही त्यांनी माहिती दिली.
ग्राहकांना किफायतशीर दरात उत्तम साहित्य देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला असून खास ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून काकोडे ट्रेडिंग कंपनी गरुडझेप घेत राहील. यापुढील काळात कंपनी राज्याबाहेर विस्तार करेल. _प्रवीण काकोडे, व्यवस्थापकीय संचालक, काकोडे ट्रेडिंग