हॉटेल असोसिएशनच्या गोवा सदस्यांची निवड

हॉटेल असोसिएशन ऑफ इंडियाने २१ सप्टेंबरला ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आयोजित ८४व्या कार्यकारिणी बैठकीत देशभर सदस्यता अभियान राबवण्याचा निर्णय घेत राज्यांच्या एचएआय चॅप्टरना महत्त्वाची जबाबदारी देण्याचे निश्चित केले.

Story: पणजी : |
21st October 2020, 11:45 pm
हॉटेल असोसिएशनच्या गोवा सदस्यांची निवड

पणजी : हॉटेल असोसिएशन ऑफ इंडियाने २१ सप्टेंबरला ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आयोजित ८४व्या कार्यकारिणी बैठकीत देशभर सदस्यता अभियान राबवण्याचा निर्णय घेत राज्यांच्या एचएआय चॅप्टरना महत्त्वाची जबाबदारी देण्याचे निश्चित केले.

 यानंतर एचएआयच्या गोवा राज्य चॅप्टरचे सदस्य म्हणून अल्कॉन व्हिक्टर ग्रुपचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक व्हिक्टर अल्बुकर्क तसेच आयएचसीएल-गोवाचे विभागीय संचालक आणि ताज हॉटेल अँड कन्व्हेन्शन सेंटर, गोवाचे सरव्यवस्थापक  विन्सेंट रामोश यांची नियुक्त करण्यात आली.

व्हिक्टर अल्बुकर्क हे स्थापत्य अभियांत्रिकीचे पदवीधर असून हॉटेल व हॉस्पिटलची उभारणी तसेच व्यवस्थापन क्षेत्रात त्यांचा ४० वर्षांहून अधिकचा अनुभव आहे. जगभरातील भ्रमंतीदरम्यानच्या अनुभवांच्या जोरावर त्यांनी गोवा राज्यात पर्यटन तसेच वैद्यकीय पर्यटन क्षेत्रात विविध उपक्रमांची संकल्पना आखत त्यांची यशस्वीपणे उभारणीही केली आहे. गोव्यामध्ये रेंट बॅक संकल्पना त्यांनीच राबवली आणि अल्पावधीतच ती यशस्वी ठरली. विन्सेंट रामोश यांच्याकडे २७ वर्षांचा हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील अनुभव असून २०१६ साली उमेद भवन पॅलेस-जोधपूरचे सरव्यवस्थापक म्हणून त्यांना ट्रिप अ‍ॅडवायजरचा जगातील सर्वोत्तम हॉटेल म्हणून पुरस्कार मिळाला आहे. त्या-त्या प्रदेशामध्ये एचएआय राज्य चॅप्टरमार्फत संघटनेचे काम चालते. राज्याच्या सर्वंकष प्रगतीसाठी तसेच रोजगार निर्मितीबरोबरच विदेशी चलनप्राप्तीसाठी राज्य पर्यटन खात्यासमवेत काम करण्याचा उद्देश संघटनेचा राहणार आहे.