पणजी : गोवा लोकसेवा आयोगातर्फे (जीपीएससी) विविध खात्यात २५ जागांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये १५ जागा या सरकारी महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकांच्या आहेत. यासाठी आयोगाच्या संकेस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम मुदत २५ ऑक्टोबर आहे. अर्जाचे शुल्क ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने भरल्यावर अर्ज गृहीत धरण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
उच्च शिक्षण संचालनालयातर्फे सरकारी महाविद्यालयांसाठी भरण्यात येणाऱ्या सहाय्यक प्राध्यापकांच्या १५ पैकी ८ जागा आरक्षित आहेत. यामध्ये वाणिज्य विषयाच्या ४, रसायन शास्त्र, कॉम्पुटर सायन्स, हार्मोनियम विषयाच्या प्रत्येकी २, तर कोकणी , हिंदी, भौतिक शास्त्र आणि अर्थशास्त्र विषयाच्या प्रत्येकी एक जागा आहेत. या जागांसाठी ४५ हजार रुपये वेतन देण्यात येईल. उमेदवार पदव्युत्तर पदवीसह नेट किंवा सेट असणे आवश्यक आहे.
आयपीएचबीमध्ये वैद्यकीय मानसशास्त्रज्ञाच्या २, शासकीय तंत्रनिकेतनात भौतिकशास्त्र लेक्चरर म्हणून २, हस्तकला खात्यात तांत्रिक अधिकाऱ्यांच्या २ जागांवर भरती केली जाणार आहे. याशिवाय गोवा वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापकाची एक जागा भरण्यात येईल. मामलेदार पदाच्या एका जागेवर भरती करण्यात येईल. तर नगर नियोजन, आणि शिक्षण खात्यात देखील प्रत्येकी एका जागेवर भरती करण्यात येणार आहे.
उमेदवार आणि अर्ज भरण्यापूर्वी आयोगाच्या संकेतस्थळावरील सूचना वाचणे आवश्यक आहे. अर्जावर मोबाईल क्रमांक आणि ई-मेल योग्य पद्धतीने लिहिण्याची आवाहन आयोगाने केली आहे. आलेल्या अर्जांची छाननी करून आयोगातर्फे उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे. आरोग्य खात्यातील वरिष्ठ पदांसाठी आवश्यक असल्यास कोकणी येण्याची येण्याची अट शिथिल करण्यात येईल.
टीप :
खाली दिलेल्या पीडीएफच्या लिंकवर क्लिक करत तुम्ही अधिक माहिती जाणून घेऊ शकता.
https://www.goa.gov.in/wp-content/uploads/2024/10/Advt-No-10-2024.pdf