मुसळधार पावसामुळे पणजीतील बहुतांश रस्ते पाण्याखाली

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
20th April, 01:29 pm
मुसळधार पावसामुळे पणजीतील बहुतांश रस्ते पाण्याखाली

पणजी : राजधानी पणजीत स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. त्यात आज सकाळी ढगांच्या गडगडाटासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे बहुतांश रस्ते पाण्याखाली गेले. यामुळे वाहन चालकांपासून पादचाऱ्यांपर्यंत सगळ्यांचीच अवस्था बिकट झाली. रस्ता कुठे आणि खड्डा कुठे, याचा अंदाज चालकांनाही येत नव्हता. त्यामुळे जीव मुठीत धरून त्यांना वाहने चालवावी लागली. आमचे छायापत्रकार नारायण पिसुर्लेकर यांच्यासह प्रतिनिधींनी पाटो, १८ जून व पणजीतील इतर ठिकाणची टिपलेली ही छायाचित्रे...


हेही वाचा