मुंबई : मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स रिटेलमध्ये गुंतवणूकदारांचा ओघ वाढतच आहे. गुरुवारी पीआयएफने रिलायन्स इंडस्ट्रीजची सहाय्यक कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर लिमिटेड (आरआरव्हीएल) मध्ये २.०४% इक्विटीसाठी ९,५५५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली.
या रिलायन्स रिटेलच्या प्री-मनी इक्विटीचे मूल्य या करारात ४.५८७ लाख कोटी रुपये आहे. प्री-मनी इक्विटी मागील गुंतवणूकीपेक्षा सुमारे ३० हजार कोटी अधिक आहे. रिलायन्स रिटेलमध्ये गुंतवणूकीची प्रक्रिया ९ सप्टेंबरपासून सिल्व्हर लेकपासून सुरू झाली. त्यानंतर केकेआर, जनरल अँटालँटिक, मुबाडला, जीआयसी, टीपीजी आणि एडीआयए या जागतिक गुंतवणूक निधीची गुंतवणूक झाली आहे. पीआयएफ कराराव्यतिरिक्त, रिलायन्स रिटेलमध्ये १०% पेक्षा अधिक इक्विटीसाठी ९ गुंतवणुकीद्वारे आतापर्यंत ४७,२६५ हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक झाली आहे.
सौदी अरेबियाबरोबर आमचे दीर्घकाळचे संबंध आहेत. पीआयएफ सौदी अरेबियाच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. त्यांच्याकडून होणार्या गुंतवणुकीचे आम्ही स्वागत करतो.
- मुकेश अंबानी, रिलायन्स इंडस्ट्रीजचे एमडी.