Goan Varta News Ad

‘मोदी सरकारच्या डिजिटल इंडियाला यश’

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल)चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सोमवारी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कच्चा माल म्हणून वर्णन करताना म्हटले आहे की, नरेंद्र मोदी सरकारने सहा वर्षांपूर्वी विणलेल्या डिजिटल इंडियाचे अर्थपूर्ण निकाल आता समोर येत आहेत.

Story: मुंबई : |
07th October 2020, 01:25 Hrs
‘मोदी सरकारच्या डिजिटल इंडियाला यश’
मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल)चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सोमवारी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कच्चा माल म्हणून वर्णन करताना म्हटले आहे की, नरेंद्र मोदी सरकारने सहा वर्षांपूर्वी विणलेल्या डिजिटल इंडियाचे अर्थपूर्ण निकाल आता समोर येत आहेत. 
अंबानी यांनी रिस्पॉन्सिबल आर्टिफिशियल इंटेलिजेंस फॉर सोशल एंपावरमेंट (रेज) २०२० च्या आभासी बैठकीमध्ये प्रमुख वक्ता म्हणून संबोधित करताना सांगितले की, मोदी सरकारने सहा वर्षांपूर्वी विणलेल्या डिजिटल इंडियाची आता भरभराट होत आहे. पंतप्रधान मोदींनी रेज २०२०चे उद्घाटन केले. ज्यामध्ये १३९ देशांमधील ६० हजार प्रतिनिधी सहभागी होत आहेत. उद्योग आणि शिक्षण यांच्या सहकार्याने ही बैठक आयोजित केली जात आहे. आरोग्य, शिक्षण आणि कृषी क्षेत्रात कायापालट करण्याचे उद्दीष्ट आहे. माहिती तंत्रज्ञान आणि नीती आयोग यांनी या परिषदेचे आयोजन केले होते. 
मुकेश अंबानी म्हणाले, 
* केंद्र सरकारने सहा वर्षांपूर्वी सुरू केलेल्या डिजिटल इंडियाचे अर्थपूर्ण निकाल आता समोर येत आहेत. 
* डेटा वापरात भारत १५५ व्या क्रमांकावरून पहिल्या स्थानावर आला आहे. 
* देशातील सहा लाख गावे नेटच्या माध्यमातून जोडली जात आहेत. घर आणि कार्यालये जोडली जात आहेत. 
* आता परवडणारे मोबाइल फोन देशातच तयार केले जात आहेत.
* देशात जागतिक स्तरीय डेटा केंद्रे तयार केली जात आहेत आणि जलद विकासाचे सर्व घटक एका ठिकाणी उपलब्ध आहेत.