CBT-२ व गोवा भूगोल-इतिहास : फोंड्यात मार्गदर्शन वर्ग

गोवा स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षांमधील यश सुनिश्चित करण्यासाठी सीबीटी-२ सह गोव्याचा इतिहास आणि भूगोल या विषयांची तयारी अत्यंत महत्त्वाची आहे. या स्पर्धा परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी फोंड्यात विशेष मार्गदर्शन वर्ग सुरू झाले आहेत.

Story: यशस्वी भव: |
26th September, 10:56 pm
CBT-२ व गोवा भूगोल-इतिहास : फोंड्यात मार्गदर्शन वर्ग

गोवा स्टाफ सिलेक्शनच्या CBT-I परीक्षा नुकत्याच पार पडल्या. अनेकविध पोस्ट्ससाठी विविध वेळा या परीक्षा पार पडल्या. या परीक्षा दोन टप्प्यांत घेतल्या जातात. सीबीटी-I आणि सीबीटी-II व त्यानंतर पोस्टच्या संख्येनुसार अंतिम यादी तयार केली जाते आणि पोस्टच्या त्या आरक्षणाच्या नियमांनुसार भरल्या जातात.

जीपीएससीतर्फे (GPSC) देखील सीबीआरटी-I (CBRT-I) आणि सीबीआरटी-II (CBRT-II) परीक्षा घेतल्या जातात. अगदी अलीकडेच पोलिस कॉन्स्टेबल पदासाठी पुरुष आणि महिला दोन्ही वर्गांच्या जवळपास ४०० पोस्ट भरण्यासाठी सीबीटी-I ही परीक्षा स्टाफ सिलेक्शनतर्फे घेण्यात आली. इंग्रजी, कोकणी, रिझनिंग आणि न्यूमरिकल या विषयांवर एकूण ६० प्रश्न विचारले गेले. खूपशा विद्यार्थ्यांना ४० च्या वर गुण (मार्क्स) पडलेले आहेत. त्यामुळे खूपसे विद्यार्थी सीबीटी-II साठी पात्र ठरतील. त्यामुळे अर्थातच सीबीटी-II परीक्षा जरा कठीणच असेल यात शंका नाही.

सीबीटी-II परीक्षेसाठी गोव्याचा इतिहास आणि काही पोस्टसाठी गोव्याचा भूगोल या विषयांवर प्रश्न विचारले जाणार आहेत. रेंज फॉरेस्टर या पोस्टसाठी टेस्ट ऑफ रिझनिंग १० मार्कांना, टेस्ट ऑफ न्यूमरिकल अ‍ॅबिलिटी १० मार्कांना, टेस्ट ऑफ इंग्लिश आणि कॉम्प्रिहेन्शन २० मार्कांना, तर जनरल जिओग्राफी ऑफ गोवा या विषयाला २० मार्क्स आहेत. एकूण ७५ मिनिटांत ६० प्रश्न सोडवायचे आहेत. पोलिस कॉन्स्टेबलसाठी भूगोलाऐवजी गोव्याचा इतिहास आहे.

गोव्याचा भूगोल या विषयावर अशी खास पुस्तके बाजारात उपलब्ध नाहीत. त्यामुळे नेमके काय व कोणते विषय करावेत हे विद्यार्थ्याला समजत नाही. गोव्याच्या इतिहासासाठी शाळेतील ८ वी, ९ वी व १० वीची ‘हिस्ट्री ऑफ गोवा’ आणि ‘फ्रीडम स्ट्रगल’ ही तीन पुस्तके वाचली की पूर्ण अभ्यास होऊ शकतो. भूगोलाबाबत तशी परिस्थिती नाही. त्याचा आपल्याला रेफरन्सनेच अभ्यास करावा लागतो.

भूगोल या विषयात २० प्रश्न येणार असल्याने जर येथे पैकीच्या पैकी गुण घेता आले, तर गुणवत्तेत (मेरिटमध्ये) येण्याची दाट शक्यता आहे. मुलांनी याकडे दुर्लक्ष करू नये. इंग्रजी आणि भूगोल यांत १००% स्कोअर करावा, चान्सेस खूप वाढतात.

गोव्यातील भूगोलाचा विचार करता खालील गोष्टींचा अभ्यास करावा:

गोव्याचे क्षेत्रफळ, जिल्हे, एकूण वाहणाऱ्या मुख्य नद्या आणि उपनद्या, गोव्यातील जमीन - तिचे प्रकार, रंग, गोव्यातील शेती - पिके, हवामान पद्धती, पडणारा एकूण पाऊस, तालुकानिहाय पिके, पाण्याचे साठे, प्राणी - पक्षी, अभयारण्ये, लोकसंख्या, हवेतील आर्द्रता, धरणे - प्रकल्प, वन्यजीव व गोव्यातील पर्यावरणीय कायदे, बायो-स्फिअर्स, खनिजे व धातू, संवर्धन योजना, विविध कायदे, म्हादईच्या सर्वोच्च न्यायालयीन तंट्याची माहिती, फ्लोरा आणि फोना, समुद्र भागातील नियम, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, प्रमुख धरणे आणि लोकसंख्या इंडेक्स, क्लायमेटिक गुंतागुंत आणि प्रदूषण, प्रमुख अन्न - संस्कृती - लोकपरंपरा, प्रमुख सण आणि त्यांचे महत्त्व, प्रमुख देवळे - चर्च यांचा सामाजिक पगडा, भाषा, मतदारसंघ, भौगोलिक समस्यांसाठीच्या विविध शासकीय योजना, दूध योजना यांवर प्रश्न विचारले जाणार आहेत. या महिन्यात ‘लोअर डिव्हिजन क्लार्क’ या पदांची ‘मेगा भरती’ सरकारतर्फे भरवण्यात आलेली आहे. विविध शासकीय विभागांसाठी खूप मोठ्या प्रमाणात ही भरती आहे. जवळपास २०० पेक्षा जास्त पदे भरली जाणार आहेत.

फोंड्यात याचे मार्गदर्शन वर्ग नुकतेच सुरू झालेले आहेत. जास्त विद्यार्थी परीक्षेला बसले की पेपर हमखास अवघड येतो, असा अंदाज आहे. सीबीटी-१ आणि २ या माध्यमातून परीक्षा होणार आहेत. किमान ४५ वर गुण मिळणे क्रमप्राप्त आहे. मुलांनी नेमका कसा व कधी अभ्यास करावा? सराव कसा करावा? याचे संपूर्ण मार्गदर्शन फोंडा येथे आपण घेऊ शकता.