एक्झिट पोल्सचा अंदाज : प्रशांत किशोर प्रभावहीन झाल्याचा दावा

न्यूज डेस्क। गोवन वार्ता
पटना : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान मंगळवारी पार पडले. पहिल्या टप्प्याचे मतदान ६ नोव्हेंबर रोजी झाले होते. निवडणुकीचा निकाल गुरुवार, १३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. मात्र, त्याआधी संभाव्य निकालाचे एक्झिट पोल समोर आले आहेत. बहुतेक कंपन्यांनी नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीलाच (रालोआ) पुन्हा बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवला आहे.
मतदानाआधी ‘ओपिनियन पोल’ जाहीर झाला होता. त्यावेळी बिहारमध्ये पुन्हा रालोआचेच सरकार येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. एक्झिट पोल्सची आकडेवारीही त्याला मिळतीजुळतीच आहे. पीपल्स पल्स, पीपल्स इन्साईट, मॅट्रीझ, दैनिक भास्कर, मार्क व जेव्हीसी या कंपन्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा नितीश कुमार व भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या हातीच राज्याच्या किल्ल्या दिल्या आहेत.