पेडणे : एसटी बसच्या खाली आल्याने दुचाकीस्वार ठार

धारगळच्या दोन खांब जंक्शनवर भीषण अपघात

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
30th July, 02:41 pm
पेडणे : एसटी बसच्या खाली आल्याने दुचाकीस्वार ठार

पणजी : पेडणे तालुक्यातील धारगळ येथील दोन खांब जंक्शनजवळ राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी भीषण अपघात घडला. २१ वर्षीय सुदीप पईकर या दुचाकीस्वाराचा एसटी बसच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना कोल्हापूरहून पेडणे मार्गे पणजीकडे जाणाऱ्या ‘हिरकणी’ एसटी प्रवासी बसने दुचाकीस्वाराला मागून धडक दिल्याने घडली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, २१ वर्षीय तरुण दुचाकीस्वार मोबाईलवर बोलत असताना त्याचे लक्ष रस्त्यावर नव्हते. याच दरम्यान मागून भरधाव वेगाने आलेली एसटी बसची त्याला धडक बसली. रस्त्यावर पडल्यानंतर दुचाकीस्वार एसटीच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातामुळे काही काळासाठी महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. घटनेनंतर स्थानिकांनी पोलिसांना पाचारण केले. काही वेळातच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतूक सुरळीत केली तसेच घटनेचा पंचनामा केला. अद्याप मृत दुचाकीस्वाराची ओळख पटलेली नाही. शवविच्छेदनासाठी मृतदेह म्हापसा जिल्हा रुग्णालयात  पाठवण्यात आला. पोलिसांनी एसटी बस चालकाची चौकशी सध्या सुरू केली आहे. या अपघाताबाबत अधिक तपास सुरू असून, सीसीटीव्ही फुटेजचीही पाहणी केली जात आहे.


(बातमी अपडेट होत आहे) 

हेही वाचा