तिसवाडीः गोव्यात लवकरच मत्स्य महाविद्यालय उभारणार: मुख्यमंत्री

पणजीमध्ये अ‍ॅक्वा गोवा मत्स्य महोत्सवाचे उद्घाटन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th January, 12:10 am
तिसवाडीः गोव्यात लवकरच मत्स्य महाविद्यालय उभारणार: मुख्यमंत्री

पणजी: सरकार गोव्यात मत्स्य महाविद्यालय स्थापन करण्यास प्रयत्नशील असून नील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासहित रोजगार निर्मितीसह राज्य मत्स्यव्यवसायात स्वयंपूर्ण व्हावे अशी योजना असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. 

पणजीमध्ये अ‍ॅक्वा गोवा मत्स्य महोत्सवाचे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मत्स्यव्यवसाय मंत्री नीलकंठ हळर्णकर, आमदार कृष्णा साळकर, आमदार रूडाल्फ फर्नांंडिस आणि अधिकारी उपस्थित होते. 

गोव्याचे समुद्रकिनारे जगभर प्रसिद्ध आहेत. पर्यटक गोव्यात समुद्र पाहण्यासाठी येतात. मासेमारीसह समुद्राचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. यातूनच रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे. सरकारने नील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. 

मच्छीमारांनी याचा फायदा घ्यावा. समुद्र आणि पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. या महोत्सवात मासेमारी तंत्रज्ञान तसेच विविध प्रकारचे मासे पाहण्याची संधी मिळणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. या महोत्सवात माशांच्या स्टॉलसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा