पोर्तुगालमधून निघालेल्या जहाजावरून कुंकळ्ळीतील युवक बेपत्ता

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
05th May, 12:03 am
पोर्तुगालमधून निघालेल्या जहाजावरून कुंकळ्ळीतील युवक बेपत्ता

मडगाव : लिस्बन पोर्तुगाल येथून निघालेल्या अॅम्बेसिडर क्रुझ लाइनच्या बोटीवरील गोमंतकीय युवक बेपत्ता झाला आहे. सदर युवक कुंकळ्ळीतील रहिवासी असून असिस्टंट इलेक्ट्रिशियन म्हणून बोटीवर काम करत होता. गुरुवारी नाश्ता केल्यापासून तो बेपत्ता असून बोटीवरील त्याच्या सहकाऱ्यांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.

अॅम्बेसिडर क्रुझ लाइनच्या मालकीच्या प्रवासी बोटीवर कुंकळ्ळीतील युवक असिस्टंट इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत होता. गुरुवारी सहकाऱ्यांसोबत नाश्ता केल्यानंतर त्याने आपली तब्येत चांगली नसल्याचे सांगत तो खोलीत जाण्यासाठी बाहेर पडला. त्यानंतर सहकाऱ्यांना तो पुन्हा दिसला नाही. या बोटीवर आणखी गोमंतकीय खलाशी कार्यरत आहेत. सदर युवक बोटीवर दिसून येत नसल्याचे व कामावर आला नसल्याचे लक्षात येताच त्यांनी बोटीवरील वरिष्ठांना याची माहिती दिली. त्याचा शोध घेण्यासाठी बोट पुन्हा ज्याठिकाणी तो हरवला असण्याची शक्यता होती त्याठिकाणी वळवून नेण्यात आली. अॅम्बेसिडर नावाचे हे जहाज जगभरातील दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यावर होते. अॅम्बेसिडर क्रुझ लाइनकडून नाविक व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध असल्याने सांगण्यात आले आहे.

गोवन सीमन असोसिएशन ऑफ इंडिया या खलाशी संघटनेचे अध्यक्ष फ्रँक व्हिएगस यांनी सांगितले की, कुंकळ्ळीतील युवक सदर बोटीवर कार्यरत होता. तो असिस्टंट इलेक्ट्रीशियन म्हणून कार्यरत होता. क्रुझवरील त्याच्या सहकाऱ्यांकडून अजूनही त्याचा शोध घेतला जात आहे. Goan Seamen Association Of India

हेही वाचा