खुद्द जेडीएसच्या महिला कार्यकर्त्यानेच प्रज्वलविरोधात दिली बलात्काराची तक्रार!

पीडित महिला तक्रारीत म्हणते, ‘त्याने बंदुकीचा धाक दाखवत माझ्या कंबरेवर हात ठेवला. पतीला ठार मारण्याची धमकी देऊन बलात्कार केला. त्याचा व्हीडिओ बनवला.’

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
04th May, 01:07 pm
खुद्द जेडीएसच्या महिला कार्यकर्त्यानेच प्रज्वलविरोधात दिली बलात्काराची तक्रार!

बेंगळुरू : माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचा नातू तथा खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या सेक्स स्कँडल प्रकरणात आता खुद्द त्यांच्याच जेडी(एस) पक्षाच्या एका कार्यकर्त्या महिलेने प्रज्वलवर बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. ‘प्रज्वलने खासदार निवासात नेऊन बंदुकीच्या धाक दाखवला. कमर पकडून बेडवर नेले आणि बलात्कार केला. त्याचा व्हीडिओही बनवला’, अशी तक्रार या महिलेने पोलिसांत दिली आहे.

वरील घटनेची कुठेही वाच्च्यता केल्यास पतीला मारून टाकू, अशी धमकीही दिली. तसेच तिचा व्हीडिओ व्हायरल करू, अशीही धमकी दिल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान, प्रज्वलवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. कर्नाटक सरकारची एसआयटी या प्रकरणाचा तपास करत आहे. जेडी(एस)ने प्रज्वल यांना यापूर्वीच पक्षातून निलंबित केले आहे. सध्या ते विदेशात फरार झाले आहेत.

पीडित महिले कार्यकर्तीने ‌दिलेल्या माहितीनुसार, तिने अनेकदा आमदार आणि खासदारांसमोर लोकांचे प्रश्न मांडले. २०२१ मध्ये तिने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाच्या जागा वाढवण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. विद्यार्थिनींची तक्रार घेऊन ती प्रज्वल यांना भेटण्यासाठी हासन येथील खासदार निवासस्थानी पोहोचली होती. तेव्हाच बलात्काराची घटना घडली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

खासदार निवासस्थानाच्या तळमजल्यावर बरेच लोक उपस्थित होते. एक कर्मचारी आला आणि तिला पहिल्या मजल्यावर जायला सांगितले. त्याला वरच्या मजल्यावर एका खोलीत बसून प्रज्वलची वाट पाहण्यास सांगितले. प्रज्वलने खाली बसलेल्या सर्वांना भेटून सर्वांना तेथून पाठवले. नंतर वरच्या मजल्यावरील खोलीत प्रज्वल आले रूम बंद करून माझ्या शेजारी बसली. प्रज्वल एकटाच खोलीत आला आणि दरवाजा बंद केला. ती घाबरून सोफ्यावरून उभी राहिली. प्रज्वलने दरवाजा बंद करण्यास विरोध केला असता तिला रोखले. लोक येऊन त्रास देतील, आपण बोलू शकणार नाही, असे सांगून तो दरवाजा बंद करत होता, असेही तक्रारीत म्हटले आहे.

‘मला प्रज्वलच्या कृत्याची कल्पना नव्हती. तो येऊन माझ्या शेजारी सोफ्यावर बसला. मला संकोच झाला. मी त्याच्याशी बोलू लागले तेव्हा त्याने माझ्या कंबरेवर हात ठेवला, मी विरोध केला तेव्हा त्याने मला सांगितले की, ‘माझ्या पतीमुळे माझ्या आईला विधानसभा निवडणूक लढवण्याचे तिकीट मिळाले नाही’’, असे पीडित महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.

‘तुझ्या पतीला राजकीयदृष्ट्या पुढे जायचे असेल तर, माझे ऐकावे लागेल. शारीरिक गरजा पूर्ण कराव्या लागतील’, असे प्रज्वलने मला आमिष दाखवले. मी नकार दिल्यावर त्याने मला धमकी दिली की, माझ्याकडे बंदूक आहे आणि पतीला सोडणार नाही, असे सांगितले. त्यानंतर त्याने माझ्या अंगावरील सर्व कपडे काढून मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले. माझ्यावर बलात्कार केला. त्याने हा व्हीडिओ लीक करण्याची धमकी दिली. जेव्हा जेव्हा त्याला गरज होती, तेव्हा त्याने मला त्याच्या वासनेची शिकार केले’, असे या तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा