एल्विश यादवच्या मागे शूक्लकाष्ट : आता ईडीने दाखल केला गुन्हा; लावले 'हे' आरोप

एल्विश यादव काही दिवसांपूर्वीच पोलिसांच्या ताब्यातून बाहेर आला होता. आरोपपत्राच्या आधारे ईडीने नवीन गुन्हा दाखल केला.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
04th May, 12:50 pm
एल्विश यादवच्या मागे शूक्लकाष्ट : आता ईडीने दाखल केला गुन्हा; लावले 'हे' आरोप

नवी दिल्ली : एल्विश यादव उर्फ ​​सिद्धार्थ यादव विरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २  नोव्हेंबर २०२३ रोजी त्याच्यावर दाखल झालेला एका आरोपपत्रास या प्रकरणाचा आधार बनवण्यात आले आहे. याप्रकरणी ईडी एल्विशची चौकशी करण्याच्या तयारीत आहे. सांप के जहर मामले के बाद एल्विश यादव अब मनी लॉन्ड्रिंग केस में फंसे, जल्द  ED कर सकती है पूछताछ - money laundering case filed against elvish yadav ed  will probe alleged

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने पीएमएलए कायद्यांतर्गत एल्विशविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गेल्या एप्रिलमध्ये उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर पोलिसांनी (नोएडा) एल्विशविरुद्ध १२००  पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. यात सापांची तस्करी, ड्रग्जचा वापर, रेव्ह पार्ट्या आयोजित करणे असे आरोप होते.एल्विश यादव पर रेव पार्टी में सांपों का इस्तेमाल करने का आरोप

या आरोपपत्राची दखल घेत ईडीने एल्विशविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या आरोपपत्रात एल्विशवर बेकायदेशीरपणे आयोजित रेव्ह पार्ट्यांना निधी दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी एल्विशसह अन्य काही आरोपींची चौकशी करण्यात येणार आहे.Elvish Yadav Talks About His One Week In Prison |Elvish Yadav ने जेल में  रहने के बाद व्लॉग किया शेयर

गेल्या वर्षी नोएडा पोलीस पार्ट्यांमध्ये सापाच्या विषाच्या पुरवठ्याची चौकशी करत असताना एल्विशचे नाव पुढे आले होते. ३  नोव्हेंबर २०२३ रोजी नोएडातील सेक्टर-४९ पोलिस स्टेशनमध्ये एल्विशसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीपल फॉर ॲनिमल्स नावाच्या एनजीओने त्याच्याविरोधात ही तक्रार दाखल केली होती. या एफआयआरमध्ये एल्विशसोबत आणखी सहा जणांची नावे आहेत.Elvish Yadav की मुश्किल अब और भी बढ़ा गई है. नोएडा पुलिस ने यूट्यूबर

याप्रकरणी पोलिसांनी पार्टीवर छापाही टाकला होता. या छाप्यात पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. अटक करण्यात आलेल्यांकडून नऊ साप जप्त करण्यात आले आहेत. यादरम्यान त्याच्याकडून २० मिली सापाचे विषही जप्त करण्यात आले. मात्र, एल्विश यादव त्यावेळी तेथे उपस्थित नव्हते.Elvish Yadav rave party case: How dangerous is snake venom drug?

यानंतर १७  मार्च २०२४ रोजी एल्विश यादवला अटक करण्यात आली होती. नोएडा पोलिसांनी एल्विशला अटक करून न्यायालयात हजर केले. आदेशानुसार त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत एल्विशने तो सापाच्या विषाचा पुरवठा करत असल्याची कबुली दिली असल्याचे सांगण्यात आले. ५  दिवस तुरुंगात घालवल्यानंतर एल्विश यादवला २२ मार्चला जामीन मिळाला.


हेही वाचा