प्रज्वलसह एच.डी. रेवण्णा गोत्यात दुसऱ्यांदा ‘लूक आऊट’ जारी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
04th May, 12:20 pm
प्रज्वलसह एच.डी. रेवण्णा गोत्यात  दुसऱ्यांदा ‘लूक आऊट’ जारी

बंगळुरू : सेक्स स्कँडलमध्ये अडकलेले कर्नाटकच्या हासन मतदारसंघाचे खासदार प्रज्वल रेवण्णा आणि त्यांचे वडील तथा जेडी(एस) पक्षाचे ज्येष्ठ नेते एच. डी. रेवण्णा यांच्याविरोधात आज दुसऱ्यांदा ‘लूक आऊट’ नोटीस जारी केले आहे. कर्नाटकचे गृहमंत्री गंगाधरैया परमेश्वरा यांनी ही माहिती आज प्रसारमाध्यमांना दिली आहे. दरम्यान, फरार असलेल्या रेवण्णा यांनी म्हैसूर येथी, पीडित महिलेच्या अपहरण प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. तर याप्रकरणी रेवण्णाचे निकटवर्तीय सतीन बावण्णा यांना अटक करण्यात आली आहे.

आम्ही एच.डी. रेवण्णा आणि प्रज्वल या दोघांविरुद्ध ‘लूक आऊट’ नोटीस जारी केली आहे. एच.डी. रेवण्णा परदेशात जाण्याचा विचार करत असल्याने आम्ही त्यांना ‘लूक आऊट’ नोटीस जारी केली होती. मात्र, काल दुसरी नोटीस देण्यात आली. नोटिशीला उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडे आज संध्याकाळपर्यंत वेळ आहे, असे गृहमंत्री परमेश्वरा यांनी म्हटले आहे.

दरम्यान, खासदार प्रज्वल रेवन्ना (३३) यांच्या अनेक अश्लील व्हीडिओ क्लिप अलीकडच्या काळात समोर आल्या आहेत. ते हासन लोकसभा मतदारसंघातून एनडीएचे उमेदवार आहेत. तिथे २६ एप्रिल रोजी मतदान झाले होते. त्यानंतर प्रज्वल राजकीय पासपोर्टवर परदेशात गेले आहेत.

हेही वाचा