अमित शहा डॉक्टर्ड व्हिडीओ प्रकरण: आणखी एकास अटक, काँग्रेस सोशल मीडिया सेलशी संबंध

आरोपी अरुण रेड्डी हा ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या (AICC) सोशल मीडिया सेलचा राष्ट्रीय समन्वयक आहे. तर त्याच्या अध्यक्षा काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत आहेत.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
04th May, 12:22 pm
अमित शहा डॉक्टर्ड व्हिडीओ प्रकरण: आणखी एकास अटक, काँग्रेस सोशल मीडिया सेलशी संबंध

नवी दिल्ली : गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संबंधित बनावट डॉक्टर्ड  व्हिडीओ  प्रकरणी दिल्ली पोलिसांची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी आता अरुण रेड्डी नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. अरुण रेड्डी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर 'स्पिरिट ऑफ काँग्रेस' नावाचे पेज चालवतो.Delhi Police arrest 'Spirit Of Congress' administrator in Amit Shah video  case | Indiablooms - First Portal on Digital News Management

अरुण रेड्डी हा ऑल इंडिया काँग्रेस कमिटी (AICC) च्या सोशल मीडिया सेलचे राष्ट्रीय समन्वयक आहे. त्याच्या अध्यक्षा काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण रेड्डी याचे काम व्हिडिओ बनवून ते व्हायरल करणे आहे. रेड्डीने मोबाईलवरून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचेही कळते. सध्या पोलिसांनी रेड्डीला अटक करून त्याचा फोन जप्त करत फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे. Amit Shah Fake Video Case: Delhi Police Arrests Cong Member Arun Reddy

 रेड्डी यास  ४ मे रोजी न्यायालयात हजर केले जाणार आहे. हैदराबाद पोलिसांनी याप्रकरणी तेलंगणा काँग्रेसच्या पाच कार्यकर्त्यांना अटक केली आहे. यापूर्वी दिल्ली पोलिसांनी डीपफेक व्हिडीओ प्रकरणी तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते रेवंत रेड्डी यांनाही समन्स बजावले गेले होते. रेड्डी आणि तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटी (TPCC) चे चार सदस्य - शिवकुमार अंबाला, अस्मा तस्लीम, सतीश माने आणि नवीन पट्टेम - यांना फौजदारी कायद्याच्या कलम ९१ आणि १६० अंतर्गत समन्स बजावण्यात आले होते.Amit Shah deep fake video case: 2 Congress leaders, party's IT Cell members  arrested by Cyber Crime police

२९  एप्रिल रोजी आसाम पोलिसांनी या प्रकरणात पहिली अटक केली. त्यांनी रितम सिंग नावाच्या व्यक्तीला अटक केली होती. याप्रकरणी २७ एप्रिल रोजी पोलिसांकडे तक्रार आली होती. तेलंगणा प्रदेश काँग्रेस पक्षाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अमित शाह यांचा डॉक्टर्ड व्हिडीओ पोस्ट केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला होता. हा व्हिडीओ अमित शाह यांनी सिद्धीपेट येथील निवडणूक रॅलीत दिलेल्या भाषणाचा आहे. ज्यामध्ये छेडछाड करून तो सोशल मिडियावर सर्वत्र व्हायरल करण्यात आला होता. तक्रारीनंतर हा व्हिडीओ काढून टाकण्यात आला.Delhi Police arrests 'Spirit of Congress' account handler, Arun Reddy in  fake video case of Amit Shah - BusinessToday


हेही वाचा