काळी जादू करत असल्याच्या संशय : ३ तास बेदम मारहाण; नंतर पेट्रोल टाकून दोघांना जिवंत जाळले

गडचिरोलीच्या आदिवासीबहुल भागात काळी जादू करत असल्याच्या संशयावरून दोन जणांना जिवंत जाळण्यात आले. यामध्ये एका पुरुष व एका महिलेला जीव गमवावा लागला. पोलिसांनी गावातील १५ जणांना अटक केली आहे.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
04th May, 11:54 am
काळी जादू करत असल्याच्या संशय : ३ तास बेदम मारहाण; नंतर पेट्रोल टाकून दोघांना जिवंत जाळले

गडचिरोली : महाराष्ट्रातील गडचिरोलीमध्ये 'जादूटोणा' केल्याच्या आरोपाखाली एका महिलेसह दोघांना जिवंत जाळण्यात आले. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला. गावातील काही लोकांनी आधी दोघांनाही बेदम मारहाण करत, त्यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना जाळले. याप्रकरणी पोलिसांनी १५  आरोपींना अटक केली आहे. आरोपींमध्ये मृत महिलेचा पती आणि मुलाचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व आरोपींना कनिष्ठ न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना ५ दिवसांची कोठडी सुनावली आहे.

गडचिरोली पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १ मे रोजी घडली. एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा गावात जमनी देवजी तेलामी आणि देशू कटिया अटलामी यांच्या विरोधात काही लोकांनी एकत्र येऊन पंचायत बोलावली. दोघांवर जादूटोणा आणि काळी जादू केल्याचा आरोप होता. मिळालेल्या माहितीनुसार तक्रार करणाऱ्या गटाने आरोप केला आहे की,  जमनी देवजी तेलामी आणि देशू कटिया अटलामी यांच्या जादूटोण्यामुळे गावातील आरोही बंडू तेलमी नावाच्या मुलीचा मृत्यू झाला. मुलीचे वय ३  वर्षे होते.

पंचायतीची बैठक संपल्यावर  १  मे रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास गावातील काही लोकांनी एकत्र येऊन दोघांनाही बेदम मारहाण केली. यानंतर रात्री दहाच्या सुमारास अर्धमेल्या अवस्थेत गावाबाहेरील नाल्यात ओढून त्यांच्यावर पेट्रोल टाकून जाळून टाकले. दरम्यान, पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना दोघांचे जळालेले मृतदेह आढळून आले.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत अटक करण्यात आलेल्या १५ जणांमध्ये देवजी मुहोंडा तेलामी (महिलेचा पती), दिवाकर देवाजी तेलामी (महिलेचा मुलगा), अजय बापू तेलामी, भाऊजी शत्रू तेलामी, अमित सामा मडावी, मिर्चा तेलामी, बापू यांचा समावेश आहे. बारसेवाडा गावात कांद्रू तेल्लामी, सोमजी कंद्रू तेल्लामी, दिनेश कोलू तेल्लामी, श्रीहरी बिरजा तेल्लामी, मधुकर देशू पोई, अमित उर्फ ​​नागेश रामजी तेल्लामी, गणेश बाजू हेदो, मधुकर शत्रू तेल्लामी आणि बिरजा तेल्लामी. आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.गढ़चिरौलीः घर से बाहर निकाला, 2 को जिंदा जलाया…काला जादू के शक में गांव  वालों ने ले ली जान; 14 गिरफ्तार - gadchiroli thrown out of house 2 burnt  alive-mobile

जमानी देवजी तेलमी यांचा भाऊ सदू मसा मुहोदा यांच्या तक्रारीवरून एटापल्ली पोलीस ठाण्यात २ मे रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य पाहून गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, अधिकारी नीळकंठ कुकडे यांच्यासह तपास पथकाने एटापल्लीच्या प्रभारी अधिकाऱ्याला कारवाईचे आदेश दिले.

हेही वाचा