हरदीप निज्जर खून प्रकरण : कॅनडा पोलिसांच्या हाती मोठे यश; ३ आरोपींना अटक, जारी केली छायाचित्रे

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
04th May, 11:26 am
हरदीप निज्जर खून प्रकरण : कॅनडा पोलिसांच्या हाती मोठे यश; ३ आरोपींना अटक, जारी केली छायाचित्रे

ओट्टावा : खलिस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची छायाचित्रे कॅनडाच्या पोलिसांनी जारी केली आहेत. रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी या तीन आरोपींची ओळख कमलप्रीत सिंग, करणप्रीत सिंग आणि करण ब्रार अशी केली आहे.Hardeep Singh Nijjar Killing: Canadian Police release images of accused,  other evidence

करणप्रीत सिंग, कमलप्रीत सिंग आणि करण ब्रार यांच्यावर निज्जरच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. तिन्ही आरोपी  स्टुडेंट व्हिसावर कॅनडामध्ये दाखल झाले होते. परंतु त्यांनी भारतीय गुप्तचरांच्या सूचनेनुसार कारवाई करत निज्जरची हत्या केली असावी, असा अंदाजही ग्लोबल न्यूजद्वारे प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.Canadian police arrest Hardeep Singh Nijjar in connection with murder  investigation – News Anemonedivingcenter

सरे येथील गुरुद्वाराबाहेर निज्जरची हत्या करण्यात आली होती. कॅनडातील तीन प्रांतांत राबवलेल्या शोध मोहिमांदरम्यान या तिघांचा सुगावा लागल्याची माहिती पोलिसांनी दिली. गेले काही महीने पोलीस आणि इतर तपास यंत्रणा त्यांच्यावर नजर ठेऊन होत्या.  गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी निज्जरच्या हत्येत भारतीय एजंटचा 'संभाव्य' सहभाग असल्याचा आरोप केला होता, त्यानंतर भारत आणि कॅनडाचे संबंध ताणले गेले होते.India-Canada row: Political space given to separatism in Canada, says MEA  on Justin Trudeau's Hardeep Nijjar remarks - India Today

हेही वाचा