रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण : पोलिसांच्या ‘क्लोजर रिपोर्ट’मध्ये धक्कादायक खुलासा

रोहित वेमुला अनुसूचित जातीचा (एससी) नाही. आपली खरी जात बाहेर येईल, अशी भीती रोहितला होती, असे पोलिसांना तपासात आढळून आले आहे. पोलिसांनी आपला अहवाल तेलंगणा उच्च न्यायालयात सादर केला आहे.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
04th May, 10:11 am
रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण : पोलिसांच्या ‘क्लोजर रिपोर्ट’मध्ये धक्कादायक खुलासा

हैदराबाद : येथील विद्यापीठातील पीएचडी स्कॉलर रोहित वेमुला याच्या आत्महत्या प्रकरणी तेलंगणा पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. रोहितला त्याची जात आणि इतर तपशील बाहेर येईल, याची भीती होती. याच भीतीपोटी जानेवारी २०१६ मध्ये त्याने आत्महत्या केली, असे या क्लोजर रिपोर्टमध्ये पोलिसांनी म्हटले आहे.Image

तेलंगणा पोलिसांनी आपल्या क्लोजर रिपोर्टमध्ये अनेक लोकांना ‘क्लीन चिट’ दिली आहे. यामध्ये सिकंदराबादचे तत्कालीन खासदार बंडारू दत्तात्रेय, विधान परिषद सदस्य एन. रामचंद्र राव, विद्यापीठाचे कुलगुरू आप्पा राव आणि तत्कालिन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या नावांचा समावेश आहे. क्लोजर रिपोर्टमध्ये अभाविपच्या अनेक सदस्यांना क्लीन चिटही देण्यात आली आहे.Image

पोलिसांना त्यांच्या तपासात असे आढळून आले आहे की, रोहित वेमुला अनुसूचित जातीचा नव्हता. त्याच्या खऱ्या जातीचे सत्य बाहेर येण्याची भीती होती. पोलिसांनी आपला अहवाल तेलंगणा उच्च न्यायालयात सादर केला असून रोहितला त्याच्या आईला अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळाल्याचे माहीत होते.Rohith Vemula's mother: Don't want your Rs 8 lakh or Rs 8 crore… Tell me  why my son died | India News - The Indian Express

या प्रमाणपत्राद्वारे रोहित वेमुलाने आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत प्रगती केल्याचे पोलिसांनी आपल्या अहवालात पुढे म्हटले आहे. रोहित वेमुलाला भीती वाटत होती की जर आपल्या जातीबद्दल सत्य बाहेर आले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित वेमुला या भीतीने सतत त्रस्त होता.

'अभ्यासापेक्षा राजकारणात जास्त सक्रिय'-क्लोजर रिपोर्टमधील दावा

विविध अंगांनी तपास करूनही, कुणीही रोहित वेमुलाला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचे सिद्ध करणारा कोणताही पुरावा सापडला नाही. रोहित त्याच्या खराब शैक्षणिक कामगिरीमुळेही तणावाखाली होता, असे पोलिसांनी अहवालात म्हटले आहे.

‘मृत व्यक्तीच्या शैक्षणिक कामगिरीवर नजर टाकली तर असे लक्षात येते की, तो अभ्यासापेक्षा विद्यार्थी राजकारणात अधिक सक्रिय होता. त्याने पहिली पीएचडी सुरू केल्याच्या दोन वर्षांतच बंद केली होती. त्यानंतर त्याने दुसरी पीएचडी सुरू केली, पण २०१५ मध्ये. पण तेथेही तो फार काही करू शकला नाही’, असेही पोलिसांनी नमूद केले आहे.Image

तेलंगणा पोलिसांच्या या क्लोजर रिपोर्टवर रोहितच्या भावाने प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या भावाचा कसा छळ करण्यात आला. त्याला लक्ष्य करण्यात आले आणि शेवटी मारण्यात आले, असे त्याच्या भावाने प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. पोलिसांनी या पैलूंचा तपास करण्याऐवजी भावाच्या जातीचा तपास केल्याचा आरोपही त्याने केला आहे.
१७ जानेवारी २०१६ रोजी रोहितने हैदराबाद विद्यापीठातील वसतिगृहाच्या खोलीत आत्महत्या केली.Rohith Vemula Was Not A Dalit': Telangana Police Closes HCU Student Suicide  Case, Absolves BJP Leaders, Former VC

या आत्महत्येनंतर देशभरातील विद्यापीठांमध्ये निदर्शने सुरू झाली. रोहित आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन या संघटनेचा सदस्य होता. वसतिगृहातून निलंबित केलेल्या हैदराबाद विद्यापीठाच्या पाच विद्यार्थ्यांमध्ये त्याचा समावेश होता.रोहितसह त्या पाच विद्यार्थ्यांवर २०१५ मध्ये अभाविप सदस्यावर हल्ला केल्याचा आरोप होता. विद्यापीठाने सुरुवातीच्या तपासात पाच विद्यार्थ्यांना क्लीन चिट दिली होती, मात्र नंतर आपला निर्णय फिरवला होता.Justice for Rohit Vemula: Authorities Reopen Probe into Tragic Suicide -  TheDeccanBharat

हेही वाचा