Goan Varta News Ad

कोविड सुविधा, व्यवस्थापनाचा आराखडा सादर करा

काँग्रेसची सरकारकडे मागणी : गलथानपणामुळेच स्थिती नियंंत्रणाबाहेर

|
23rd April 2021, 12:43 Hrs
कोविड सुविधा, व्यवस्थापनाचा आराखडा सादर करा

प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : कोविड रुग्ण हाताळण्यासाठी राज्यातील साधनसुविधा, व्यवस्थापन, तसेच भविष्यातील नियोजनाबाबत सरकारने आराखडा सादर करावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. सरकारच्या गलथानपणामुळेच राज्यातील करोनाची स्थिती नियंंत्रणाबाहेर गेल्याचा आरोप विरोधी पक्ष काँग्रेसने केला आहे. पक्षाचे पदाधिकारी तुलियो डिसोझा यांंनी गुरुवारी काँग्रेस भवनमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी पणजी गटाचे अध्यक्ष जोएल आंंद्राद उपस्थित होते.
तुलियो डिसोझा पुढे म्हणाले, कोविड रुग्णांंना आवश्यक त्या दर्जाचे उपचार मिळत नाहीत. वैद्यकीय सुविधांंचा अभाव आहे. कोविड रुग्ण व उपचारांंचे व्यवस्थापन सदोष आहे. यात सुधारणा होण्याची गरज आहे. सदोष व्यवस्थापन व उपचारांंना विलंंब झाल्याने बरेच रुग्ण दगावले आहेत.
राज्यात कोविड लसीची कमतरता आहे. ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध नाही. ऑक्सिजनचा नियमित व पुरेसा पुरवठा होण्यासाठी सरकारने कोणती पावले उचलली आहेत, हे सांंगणे आवश्यक आहे. कोविड लस देण्यासाठी ‘टीका उत्सव’ सुरू आहे. या उत्सवाचा नगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न भाजप सरकारने केला, असेही डिसोझा म्हणाले.
आंदोलने दडपण्यासाठी करोनाचे निमित्त : आंद्राद
करोना नियंंत्रणात आणण्यासाठी सरकारने रात्रीची संंचारबंंदी जाहीर केली आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दीवर नियंंत्रण ठेवण्यासाठी कोणती व्यवस्था अाहे, असा प्रश्न जोएल आंंद्राद यांंनी केला. सरकारच्या निर्णयामध्ये सुसूत्रतेचा अभाव आहे. करोनाचा लाभ घेत सरकारने आंंदोलन करणारे टॅक्सीवाले आणि विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप ज्योएल आंंद्राद यांंनी केला. करोना रूग्णांंवर उपचार करण्यासाठी पुरेशा साधनसुविधा नाहीत. साधनसुविधांंचा अभाव हेच करोना रुग्ण वाढण्यामागचे खरे कारण आहे, असेही जोएल आंंद्राद म्हणाले.