Goan Varta News Ad

बीएमडब्ल्यूच्या अर्बन रिटेल स्टोअरचे उद्घाटन

|
26th August 2020, 12:24 Hrs
बीएमडब्ल्यूच्या अर्बन रिटेल स्टोअरचे उद्घाटन

हैदराबाद : बीएमडब्ल्यू इंडियाने हैदराबाद येथे आपल्या बीएमडब्ल्यू अर्बन रिटेल स्टोअरचे  केयुुएन एक्स्लुसिव्हसोबत उद्घाटन केले. बीएमडब्ल्यू फॅसिलिटी नेक्स्ट कन्सेप्टवर आधारित बीएमडबल्यू अर्बन रिटेल स्टोअर ही डीलर नेटवर्कची उत्क्रांती नवीन युगाच्या अर्बन स्पेसमध्ये झालेली आहे. त्यातून ग्राहकांना एका खास ‘फिजिटल’ वातावरणात समृद्ध अनुभव मिळतो. ज्यात सर्वोत्तम प्रत्यक्ष अनुभव डिजिटल नावीन्यपूर्णतेसह येतो. या सुविधेत बीएमडब्ल्यू आणि मिनी लाइफस्टाइल अ‍ॅपरल आणि कार अ‍ॅक्सेसरीजचे स्टोअर असून त्यासोबत एक कॅफे आहे. हे अर्बन रिटेल स्टोअर प्लॉट नंबर- १  २, सर्व्हे नंबर ४०३/१, रोड नंबर १, नंदगिरी हिल्स, जुबिली हिल्स, हैदराबाद, तेलंगणा- ५०००३३ येथे स्थित आहे आणि त्याचे प्रमुख गौतम गुडिगोपुरम, डीलर प्रिन्सिपल केयुएन एक्स्लुसिव्ह हे आहेत. बीएमडब्ल्यूू अर्बन रिटेल स्टोअरमध्ये एका सजीव, आधुनिक आणि संवादात्मक वातावरणासह इंटिग्रेटेड कॅफे आहे. बीएमडब्ल्यू ब्रँडची विविध रूपे, त्यांची उत्पादने आणि सेवा पाहता येतात. या स्टोअरमध्ये बीएमडबल्यू आणि मिनी लाइफस्टाइल कलेक्शन समाविष्ट आहे. ज्यात अ‍ॅपेरल, इलेक्ट्रॉनिक्स, डाय हायपन कास्ट मिनिएचर्स, ऑल न्यू बीएमडब्ल्यू क्रूझ बाइक्स आणि विविध प्रकारच्या कार अ‍ॅक्सेसरीज समाविष्ट आहेत.


बीएमडब्ल्यू अर्बन रिटेल स्टोअरमध्ये आमच्या ग्राहक तसेच चाहत्यांना एक विशिष्ट ब्रँड अनुभव देण्यासाठी नवीन अध्याय आहे. या आधुनिक ‘फिजिटल’ स्टोअरच्या प्रत्येक घटकात बीएमडब्ल्यू  ब्रँडची वैशिष्टे दिसून येतात आणि एक खास प्रगतीशील अनुभव त्यातून मिळतो. 

- विक्रम पावाह, प्रेसिडेंट, बीएमडब्ल्यू ग्रुप इंडिया