तिसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, शरद पवार आदीं दिग्गजांनी केले मतदान

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
07th May, 04:17 pm
तिसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, शरद पवार आदीं दिग्गजांनी केले मतदान

पणजी : लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यात आज गोव्यासह ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ९२ मतदारसंघांत मतदानाची प्रक्रिया पार पडली. या टप्प्यात एकूण १,३५१ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. यामध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आदी दिग्गज नेत्यांचा समावेश होता.


लोकसभेसाठी दुपारी ३ वाजेपर्यंत ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश मिळून एकूण ५३.६० टक्के मतदान झाले. यामध्ये सर्वांत कमी महाराष्ट्रात ३२ टक्के मतदान झाले होते. तर बिहार आणि छत्तीसगडमध्ये मिळून ३ मतदारांचा मृत्यू झाला. बिहारमध्ये मतदानादरम्यान पीठासीन अधिकारी आणि होमगार्ड जवानाचा मृत्यू झाला आहे. छत्तीसगडमध्ये सुरगुजा लोकसभा मतदारसंघातील जशपूर जिल्ह्यात मतदानासाठी येत असताना एका वृद्धाचा मृत्यू झाला. ते लोडममधील जामतोरी मतदान केंद्रावर पोहोचले होते, परंतु मतदान करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.


निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी ३ वाजेपर्यंत ५३.६० टक्के मतदान झाले. यात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ६३.११% आणि महाराष्ट्रात सर्वात कमी ४२.६३% मतदान झाले. त्यापूर्वी दुपारी १ वाजेपर्यंत ४१.८८ टक्के मतदान झाले होते. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ४९.२७% ​​आणि महाराष्ट्रात सर्वात कमी ३१.५५% मतदान झाले.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबादचे भाजप उमेदवार आणि टीएमसी समर्थकांमध्ये हाणामारी झाली. उत्तर प्रदेशातील संभलमध्ये पोलिसांनी लोकांवर लाठीचार्ज केला. यामध्ये काही जण जखमी झाले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमधील निशान उच्च माध्यमिक विद्यालयात मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघांतर्गत अहमदाबादमधील मतदान केंद्रावर मतदान केले.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माळेगाव येथे आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या सोबत त्यांची कन्या व बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे या देखील उपस्थित होत्या.

हेही वाचा

लोकसभा पहिल्या टप्प्यासाठी सरासरी ६३ टक्के मतदान

निवडणूक आयोगाने जाहीर केली दोन्ही टप्प्यातील मतदानाची अचूक आकडेवारी, मतदानाची टक्केवारी वाढली

हेही वाचा