मडगाव रेल्वेस्थानकावर बेवारस बॅगमध्ये सापडला ३.९७ लाखांचा गांजा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
19th April, 02:24 pm
मडगाव रेल्वेस्थानकावर बेवारस बॅगमध्ये सापडला ३.९७ लाखांचा गांजा

मडगाव : कोकण रेल्वे पोलिसांनी आज मडगाव रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून ३.९७ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला. प्लॅटफॉर्मवरील एका बेवारस बॅगेत हा गांजा आढळून आला. पोलीस बॅग सोडून गेलेल्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कोकण रेल्वे पोलीस मडगाव रेल्वेस्थानक परिसरात गस्त घालत होते. गस्त सुरू असताना प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर एक बेवारस बॅग आढळून आली. त्यात ३.९०० किलोग्रॅम गांजा असल्याचे आढळून आले. याची किंमत ३ लाख ९७ हजार इतकी होते. पोलिसांनी हा गांजा जप्त केला आणि बॅग सोडून गेलेल्या व्यक्तीचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता काळ्या रंगाचे टीशर्ट घातलेल्या एका ३० ते ३५ वर्षीय युवकाकडे ती पिशवी होती, असे दिसून आले आहे. याप्रकरणी कोकण रेल्वे पोलीस निरीक्षक सुनील गुडलर यांच्या मार्गदर्शनाखाली  संशयित युवकाचा शोध घेतला जात आहे.

हेही वाचा