इराणमध्ये रेल्वे प्रवास टाळा; इस्रायली लष्कराचा नागरिकांना इशारा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
07th April, 02:00 pm
इराणमध्ये रेल्वे प्रवास टाळा; इस्रायली लष्कराचा नागरिकांना इशारा

तेहरान : मध्यपूर्वेत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्त्रायल संरक्षण दलाने (Israel Defense Forces) (आयडीएफ)  इराणमधील नागरिकांना आज रेल्वेने प्रवास न करण्याचा इशारा दिला आहे.

आयडीएफने आपल्या फारसी भाषेतील सोशल मीडिया खात्यावरून प्रसिद्ध केलेल्या संदेशात, “आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण देशात आज रात्री ९ वाजेपर्यंत रेल्वेचा वापर आणि प्रवास टाळावा,” असे स्पष्टपणे नमूद केले आहे. तसेच, “रेल्वे किंवा रेल्वेमार्गांच्या परिसरात उपस्थित राहणे जीवाला धोका निर्माण करू शकते,” असा इशाराही देण्यात आला आहे.

नागरी पायाभूत सुविधांवर हल्ला करण्याची धमकी 

दरम्यान, अमेरिकेचे (US) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump)  यांनी इराणने (Iran) होर्मुझ सामुद्रधुनीत मुक्त वाहतुकीला परवानगी न दिल्यास नागरी पायाभूत सुविधांवर हल्ला करण्याची धमकी दिल्याने परिस्थिती आणखी तणावपूर्ण झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर आयडीएफने रात्री उशिरा तेहरान (Tehran)  येथील “राजवटीशी संबंधित पायाभूत सुविधांवर” हवाई हल्ल्यांची मालिका पूर्ण केल्याचा दावा केला आहे. या कारवाईत हेजबुल्लाहशी (Hezbollah) संबंधित काही सदस्य ठार झाल्याचा दावा देखील करण्यात आला आहे.

दरम्यान, इराणकडून इस्रायलच्या दिशेने डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांनाही अडवण्यात यश आल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला आहे.

सध्याच्या परिस्थितीमुळे इराणमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

हेही वाचा